निलेश घायवळच्या राजकीय कनेक्शवर अजित पवार रोकठोक बोलले, कोण कोणाच्या जवळचा बघू नका, पोलिसांनी द
पुणे: पुण्यातील कोथरूड परिसरात झालेल्या गोळीबारानंतर घायवळ गँगचा म्होरक्या निलेश घायवळचे (Nilesh Ghaywal) अनेक कारनामे समोर आले आहेत. अशातच यावरून महायुतीतील नेत्यांनी एकमेकांवर मोठे आरोप केल्याचंही दिसून आलं. निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळसाठी राज्याच्या गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी आपला अधिकार वापरला. गुंड प्रवृत्तीच्या सचिन घायवळला अधिकार वापरून शस्र परवाना दिल्याचा दावा होत आहे. याप्रकरणी आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) सविस्तरपणे भाष्य केलं आहे. आज पुण्यात राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या घायवळबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, मी स्वतः सीपींना सांगितले आहे, कोण कुठल्या गटाचा, ताटाचा, पक्षाचा, कुणाचा जवळचा कार्यकर्ता, लांबचा कार्यकर्ता, कोणाबरोबर फोटो आहेत, नाहीत, हे असलं काही बघू नका. जर तिथं चूक असेल जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल, नियमांची पायमल्ली केली असेल, किंवा करत असेल तर त्याच्यावरती ॲक्शन घ्या, अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली. (Ajit Pawar)
Ajit Pawar: काही लोकांनी शिफारस केलेली असली तरी…
पुढे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मला सांगितलं, काही लोकांनी शिफारस केलेली असली तरी शस्त्र परवाना दिलेला नाही, असं स्वतः आयुक्तांनी मला सांगितलं आहे, त्यावर मी आयुक्तांना सांगितला आहे, पुण्याचा असो किंवा पुण्याच्या बाहेरील असो महाराष्ट्रातील असो, कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवणं हे आपल्या सर्वांचे काम आहे, पोलिसांचे देखील ही महत्त्वाची जबाबदारी आहे, मी त्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप कोणाकडूनही होऊ देणार नाही, मी दोन दिवस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे तिघे एकत्र होतो, पंतप्रधानांनी कार्यक्रमामुळे त्यावेळी देखील हा विषय निघाला होता, मुख्यमंत्र्यांनी देखील हीच भूमिका घेतली आहे, अजिबात कोणाची फिकीर करायची नाही, ज्यांनी चुका केलेल्या असतील त्यांच्यावर कारवाई करायची, एकंदरीत या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील कोणी संबंधित असतील, त्यांच्यावर पुढची कारवाई केली जाईल, असं आश्वासन अजित पवारांनी यावेळी दिलं आहे.
Ajit Pawar: कोण काय म्हणतो, हा ज्याचा त्याचा प्रश्न
शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरती निलेश घायवळसोबत संबंध असल्याचे आरोप केले, याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, कोण काय म्हणतो, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. संविधानाने प्रत्येकाला तो अधिकार दिलेला आहे, माझा एवढेच मत आहे. मी राज्याच्या प्रमुखांशी बोललो आहे, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, पालकमंत्री म्हणून तुम्ही मला अनेक वर्ष झालं पाहत आहात, अनेकजण फोटो काढतात, आपल्याला महिती नसतं कोण काय असतं, मोबाईलने सेल्फी काढले जातात, फोटो असले म्हणजे संबंध असतात असे नाही. चौकशी करताना फोन, संभाषण पुरावे मिळाले तर कारवाई केली जाईल. मागच्या काळात काहीबाबतीत काहींना पक्षप्रवेश आझमभाईं पानसरेंनी द्यायला लावला, चुकीच्या व्यक्तीला पक्षप्रवेश दिला, मला कळल्यावर पक्षातून काढून टाकलं. मी जाहीरपणे बोलतो, अन्याय झाला तर मी तुमच्याकरता सर्वस्व पणाला लावेन, पण तुमचे हात बरबटले असले तर तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
Ajit Pawar: तर तो मंत्री दोषी आहे
घायवळला पासपोर्ट कोणी दिला, शिफारस कोणी दिली, याची चौकशी करायला सांगितली आहे. काहींनी शिफारस केली पण सीपींनी परवाना दिला नाही. कोणाचा दबाव असेल तर चौकशी होईल, शस्त्र परवाना देण्याच्या योग्यतेचा आहे की नाही व्यक्ती हे तपासायचं काम पोलिसांचं आहे. मी 32 वर्षे राजकीय जीवनात एखाद्या गोष्टीला रिमार्क मारला, तर ती फाईल सचिवाकडे जाते
तेव्हा त्यांनी लक्षात आणून द्यायचं असतं, तुम्ही सांगताय पण वस्तुस्थिती वेगळी आहे, शिफारस केल्यानंतरही संबंधित पोलिसांकडून, संबंधित खात्याकडून वस्तुस्थिती सांगितली जाते. मात्र, तरीही प्रतिकुल मत असूनही मंत्र्याच्या आग्रहाने त्यावर कार्यवाही झाल्यास तो मंत्री दोषी आहे,असं अजित पवार म्हणालेत.
https://www.youtube.com/watch?v=e8vlj_mzzj4
आणखी वाचा
Comments are closed.