पुण्यात शिंदे गटात दुफळी, धंगेकर 165 जागांवर ठाम तर भानगिरे भाजपकडे फक्त 35-40 जागा मागण्याच्य

पुणे: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी हालाचाली सुरू केल्या आहेत, इच्छुकांच्या मुलाखती, चर्चा, युती,जागावाटप या घडामोडींना वेग आला आहेस, अशातच महायुतीत मित्रपक्ष काही ठिकाणी सोबत तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढणार असं चित्र निर्माण झालं आहे, जागावाटपासाठी बैठकांना देखील वेग आला आहे.   अशातच आज पुण्याच महायुतीतील शिवसेना आणि भाजपची (Shivsena And BJP) एक बैठक पार पडत आहे. एकीकडे पुण्यात वरिष्ठ नेत्याच्या उपस्थितीत होणाऱ्या महायुतीच्या बैठकीसाठी शिवसेना नेते रविंद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) निमंत्रण देण्यात आल नाहीये. तरीही धंगेकर १६५ जागांवर उमेदवार देण्यासाठी ठाम आहे, मात्र शहरप्रमुख नाना भानगिरे महायुतीसोबत युती करण्यावर ठाम आहेत आणि ३५-४० जागा मागणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे पुण्यातील शिवसेनेत ताळमेळ नसल्याचा चर्चांना उधाण आलं आहे. भाजप सोबत युती करण्यासाठी धंगेकर अडचण ठरत आहेत का? किवा त्यांच्या इच्छेविरोधात ही युती करण्याच्या शिवसेना तयारीत आहेत का? असा प्रश्न आहे. अंतिम निर्णय एकनाथ शिंदे यांचा असणार आहे.त्यामुळे एकनाथ शिंदे नाना भानगिरे यांचं म्हणणं मानणार की धंगेकरांचं (Ravindra Dhangekar) ऐकून स्वबळावर लढणार हे पाहवं लागणार आहे.

Pune News:  पुण्यात दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त बैठक

आज पुण्यात दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ आणि शहराध्यक्ष गणेश बिडकर उपस्थित राहणार आहेत. तर शिंदे गटाकडून उद्योगमंत्री उदय सामंत, उपनेत्या निलम गोऱ्हे, माजी आमदार विजय शिवतारे आणि संपर्कप्रमुख नाना भानगीरे सहभागी होणार आहेत.

Pune News: रवींद्र धंगेकरांना बैठकीला बोलावलं नाही

आज पार पडत असलेल्या महायुतीच्या बैठकीसाठी रविंद्र धंगेकरांना आमंत्रण नाही, भाजप नेत्यांच्या विरोधामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून रविंद्र धंगेकरांना निर्णय प्रक्रियेतून डावलण्यात आले असल्याची चर्चा आहे. पुणे महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्याकडून महायुती म्हणून लढविण्यात येणार आहे. त्यासाठी आज दोन्ही पक्षाच्या नेत्यांची एकत्रीत बैठक पुण्यात होतेय. या बैठकीला भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, गणेश बिडकर उपस्थित राहणार आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून उदय सामंत, निलम गोर्हे, विजय शिवतारे, नाना भानगीरे हे उपस्थित राहणार आहेत. मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख असलेल्या माजी आमदार रविंद्र धंगेकरांना या बैठकीचे आमंत्रण नाही. धंगेकरांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गट सर्व १६५ जागा लढवण्याची तयारी करतोय असा दावा केला होता तर आता त्या़ंच्याच पक्षाच्या नेत्यांकडून आज भाजपला युतीत ३५ ते ४० जागा मिळाव्यात यासाठी प्रस्ताव देण्यात येणार आहे.

आणखी वाचा

Comments are closed.