Pune News – भावाच्या गुणपत्रिकेत खाडाखोड केली, संतापलेल्या पित्याने 9 वर्षांच्या लेकीला संपवले
भावाच्या गुणपत्रिकेत खाडाखोड केल्याच्या रागातून पित्याने 9 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कदायक घटना पुण्यात घडली. दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात पित्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शांताराम दुर्योधन चव्हाण (33) असे आरोपी पित्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलाने भावाच्या गुणपत्रिकेत खाडाखोड केली होती. याचा राग मनात धरून पित्याने संतापाच्या भरात टोकाचं पाऊल उचललं. आरोपीने लाकूड कापण्याच्या मशीनने मुलीच्या गळ्यावर, डोक्यावर आणि शरीरावर वार केले. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. मुलीची हत्या केल्यानंतर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मुलीचे प्रेत कापडात गुंडाळून घराला आग लावून अपघात भासवण्याचा प्रयत्न केला.
हा गुन्हा लपवण्यासाठी आरोपीला साथ देणाऱ्या चिंगु शिंदबाद भोसले या महिलेलाही पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण दौंड तालुका हादरला आहे. पोलीसांनी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
Comments are closed.