Jalna News – अंबड-शहागड रस्त्यावरील वडीगोद्री येथे दोन वाहनांची समोरासमोर धडक, अपघातात ट्रक चालक ठार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जालन्यातील अंबड-शहागड रस्त्यावर वडीगोद्री येथे मंगळवारी सकाळी 11 वाजता विटा वाहणार्‍या ट्रकची व माल वाहतूक ट्रकची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात माल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालक जागीच ठार झाला. विटभट्टी ट्रकमधील चालक व चार मजुरांचे नशिब बलवत्तर म्हणून ते सुखरूप बाहेर पडले.

सादिक खान (44) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. राजू मोहन बिलाल (35) आणि शेख अब्दुल मेहमूद (45) अशी जखमींची नावे आहेत. विटा वाहून नेणारा ट्रक हा शहागडवरुन वडीगोद्रीकडे जात होता, तर मालवाहू ट्रक हा शहागडकडे जात होता. यादरम्यान वडीगोद्रीजवळ अंबड-शहागड रस्त्यावर दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात मालवाहू ट्रकचा चालक जागीच ठार झाला.

अपघात इतका भीषण होता की ट्रकचा समोरचा भाग पूर्ण दबल्याने चालकही यात दबला गेला. त्यास जेसीबी सहाय्याने बाहेर काढण्यात आले. विटा घेऊन जाणार्‍या ट्रक चालकासह चार मजुरांना सुदैवाने कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. विटा वाहनाचे मागील ट्रक निखळून पडले होते. मृतदेह वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

Comments are closed.