Ratnagiri News – आजारपणाला कंटाळून ज्येष्ठ व्यक्तीने जीवन संपवले
रत्नागिरीतील गोळप गावात एका प्रौढाने आजारपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार 5 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या कालावधीत घडली.
अशोक रामचंद्र मोरे (56,मुळ रा.पनवेल रायगड, सध्या रा.गोळप,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी अशोक मोरे हे घरात एकटेच होते. त्यावेळी त्यांनी आजारपणाला कंटाळून बेडशीट फाडून राहत्या घरातील सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी 1 च्या सुमारास त्यांची पत्नी घरी परतली असता तिला अशोक मोरे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.
याबाबत पूर्णगड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Comments are closed.