Ratnagiri News – अंगारकी चतुर्थीनिमित्त आंजर्ले येथील कड्यावरील गणपती मंदिरात भाविकांची गर्दी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अंगारकी चतुर्थीनिमित्त आंजर्ले येथील कड्यावरील गणपती मंदिरात मंगळवारी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. देवस्थानकडून दर्शनासाठीची उत्तम व्यवस्था ठेवल्याने सर्वच भाविकांना श्रीं चे अगदी मनोभावे दर्शन घेता आले. दापोलीतील आंजर्ले येथील कड्यावरील श्री गणपती देवस्थान हे सुप्रसिद्ध देवस्थान आहे. आंजर्लेत पर्यटनासाठी येणारे पर्यटक हे हमखास करून आंजर्लेतील सुप्रसिद्ध कड्यावरील गणपती मंदिरात देवदर्शनासाठी येतात.

पर्यटकांसोबतच दापोली, मंडणगड, गुहागर, खेड, चिपळूण तसेच रायगड जिल्ह्यातील भक्तगण मोठ्या प्रमाणात येथे दर्शनासाठी येतात. आंजर्ले येथील कड्यावरील गणपती मंदिरातील श्री गणेशाच्या मूर्तीचे वर्णन शब्दांत करणे तसे कठीणच आहे. गाभाऱ्यातील श्रींच्या मूर्तीवर विलक्षण तेज आढळते. पाच फूट उंचीची मूर्ती पूर्वाभिमुख असून शेजारील रिद्धि-सिद्धिच्या मूर्ती सुमारे एक फूट उंचीच्या आहेत. श्री सिद्धिविनायकाचे मंदिर अर्थात कड्यावरील श्री गणपती देवस्थान हे अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थीनिमित्ताने श्रीं च्या दर्शनासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी होते.

Comments are closed.