पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक; कोण-कोण
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या जागी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) पालकमंत्री असलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आज पहिल्यांदा बैठक पार पडत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक पार पडत आहे. बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार उपस्थित आहेत. सुनेत्रा पवार मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरसिंगने बैठकीला उपस्थित राहिले आहेत. पुणे विभागीय कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व अधिकारी देखील बैठकीला उपस्थित आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार ही पहिलीच बैठक घेणार आहेत.(Pune News)
पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीला उपस्थित असणारे नेते
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (ऑनलाइन)
चंद्रकांत पाटील (ऑनलाईन)
अमोल कोल्हे (ऑनलाईन)
सुप्रिया सुळे (ऑनलाईन)
नीलम गोऱ्हे
दत्तात्रय भरणे
माधुरी मिसाळ
आमदार
सुनील शेळके ,राहुल कुल, शंकर मांडेकर
राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) पहिली बैठक आज (गुरुवारी) पर पडली आहे. या बैठकीत ‘डीपीसी’च्या गेल्या वर्षभरातील कामकाजाला आढावा आणि २०२६-२७ या वर्षासाठीचा आराखडा तयार करून निधीची मागणी केली जाणार आहे. आतापर्यंत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार हे ‘डीपीसी’चा आराखडा तयार करून राज्याचे अर्थमंत्री म्हणून निधी मंजूर करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना काही प्रमाणात झुकते माप देत होते. मात्र, आता अर्थ खाते हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असल्याने ते अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’च्या लोकप्रतिनिधींना मुबलक निधी देणार का, याबाबत चर्चा सुरू आहे.
आणखी वाचा
Comments are closed.