पुण्यातील कोंढव्यात दहशतवादी? एटीएस अन् पुणे पोलिसांचं सर्च ऑपरेशन, संशयितांना ताब्यात घेऊन चौक


पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात (Pune Kondhwa) मध्यरात्रीपासून तब्बल 18 ठिकाणी मोठं सर्च ऑपरेशन सुरू आहे. महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा मिळून हे संयुक्त ऑपरेशन (search operation) राबवत आहेत. काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.(Multiple enforcement agencies, including Pune Police, are conducting searches in Pune’s Kondhwa area)

या कारवाईने केवळ राज्यातच नव्हे, तर देशभरात खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी दोन वर्षांपूर्वीच बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना कोंढवा परिसरातून अटक केली होती. त्यानंतर देशातील संभाव्य दहशतवादी कट उधळण्यात यश आलं होतं. त्याच भागात आता पुन्हा काही संशयित तपास यंत्रणांच्या नजरेत आले आहेत.

पोलिसांकडून इतकंच पुष्टी करण्यात आलं आहे की, हे संयुक्त सर्च ऑपरेशन असून त्यात महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्रातील सुरक्षा यंत्रणा एकत्रितपणे काम करत आहेत. शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर तपशील अधिकृतरीत्या जाहीर केला जाईल, असं पोलिस सूत्रांनी सांगितलं.

आणखी वाचा

Comments are closed.