पुण्यात मविआचं समांतर जागा वाटपाबाबत एकमत; वंचित किंवा ‘आप’ला सोबत घेण्यासाठीही हालचाली, पण एका
पुणे: पुण्यात पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत जागावाटपाच सुत्र निश्चित करण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती आहे. पुणे महापालिकेत १६५ जागा आहेत. त्यापैकी कॉंग्रेस (Congress), शिवसेना उद्धव ठाकरे (Shivsena UBT) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (NCP Sharad pawar) पक्षाने प्रत्येकी ५० जागा लढवण्यावर तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. उरलेल्या पंधरा जागा वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पक्षासाठी सोडण्याची तयारी या तिन्ही पक्षांनी दर्शवली आहे. वंचित आणि आम आदमी पक्षाला महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्मान सेनेला, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने त्यांच्या कोट्यातून जागा द्याव्यात असा निर्णय या बैठकीत झाला आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामावून घेण्याचे महाविकास आघाडीकडून प्रयत्न होत असले तरी वंचितने २८ जागांची मागणी केली आहे. त्यामुळे वंचित महाविकास आघाडीत सामील होणार का याबद्दल स्पष्टता नाही.
NCP Pune: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची प्रस्तावित युती फिस्कटली
पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्रित जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडीची चर्चा काल (शुक्रवारी, ता २६) फिस्कटली. कारण अजित पवारांनी शरद पवारा़ंच्या पक्षाला अवघ्या तीस ते पस्तीस जागा देऊ केल्यात आणि घड्याळ या चिन्हावर लढण्याची अट घातली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाचे अंकुश काकडे (Ankush Kakde) आणि विशाल तांबे (Vishal Tambe) हे काल रात्री झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर होते. त्यामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुन्हा महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा प्रयत्न करतोय. मात्र अद्याप कोणताही ठाम निर्णय झालेला नाही, अशी माहिती समोर आली होती, अशातच दोन्ही राष्ट्रवादीची पुणे महापालिकेत आघाडी होणार नाही. आम्ही महाविकास आघाडीतून लढणार असल्याची माहिती अंकुश काकडे (Ankush Kakde) यांनी दिली आहे. घडाळ्याच्या चिन्हावर लढण्याचा अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवारांना अमान्य असल्याची माहिती आहे.
NCP Pune: शिवसेना शिंदे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता
पुणे महानगरपालिकेत अजित पवारांची (Ajit Pawar NCP) राष्ट्रवादी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्यास सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी दिली आहे. भाजप (BJP And Shivsena) शिवसेना युती जागा वाटपावरून होत नाही आणि इकडे दोन्ही राष्ट्रवादीचे जागा वाटपावरून अंतिम निश्चित काही निर्णय होत नसल्याने पुणे महानगरपालिकेत नव्याने शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी लढण्यासाठी चर्चा सुरू करण्यात आली आहे. भाजपाकडून मान नको मात्र कार्यकर्त्यांचा अपमान ही नको कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी वरिष्ठांना कार्यकर्त्याच्या भावना सांगितल्याची माहिती रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी दिली आहे. दुपारपर्यंत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यात होईल अशी माहिती रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे.
NCP Pune: चिन्हामुळं पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी फिस्कटनार नाही, अजित पवार गटाचे एक पाऊल मागे
पुण्याप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये चिन्हामुळं दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी फिस्कटणार नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारीवर लढायचं असेल तर आम्ही घड्याळाचा हट्ट धरणार नाही, असं म्हणत पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांच्या शहराध्यक्षांनी एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नव्हे तर जागा वाटपावरून आम्ही आघाडीची चर्चा फिस्कटू नये, असा प्रयत्न करतोय. अजित दादांनी शरद पवार राष्ट्रवादीच्या सुलक्षणा शिलवंत यांना माझ्या प्रभागातून उमेदवारी द्या, असं म्हटलं, तर एकवेळ मी लढणार नाही. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणू, असं म्हणत शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी, यासाठी सर्वोतोपरी तयारी दर्शवली आहे, असं असलं तरी जो पर्यंत अधिकृत घोषणा होत नाही, तो पर्यंत या चर्चांवर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही.
आणखी वाचा
Comments are closed.