अजितदादांची ‘ॲक्शन’ अन् पोलिसांकडून ‘रिॲक्शन’; स्वयंघोषित भाई, गुंडांची वरात काढत भरला दम; म्हण
पुणे : शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे. अगदी क्षुल्लक कारणास्तव वाद, हाणामारी, खून, हत्या, चोऱ्या, वाहनांची तोडफोड, महिलांवरील अत्याचार, कोयते हातात घेऊन दहशत माजवणं, अशा घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या घटनांवर आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आता पुणे पोलिसांनी कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे. दहशत पसरवणाऱ्या भागांमध्येच गुंडांना धडा शिकवण्यासाठी पुणे पोलिसांकडून त्यांची धिंड काढली जात आहे. ज्या ठिकाणी गुन्हा केला, त्याच ठिकाणी गुंडांची वरात, धिंड काढण्याचा पॅटर्न पुणे पोलिसांनी सुरू केला आहे. तरीही काही गुंड याला जुमानत नसल्याचं चित्र आहे. त्यांना आता पुणे पोलिसांनी सज्जड दम दिला आहे. महिलांची छेडछाड काढाल, हवेत कोयते फिरवाल तर भर चौकात मारू असा सज्जड दमच पोलिसांनी गुडांना दिला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पुणे पोलिसांनी स्वयंघोषित भाईंना, गुंडांना भर चौकात वरात काढत सज्जड दम भरला आहे. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका गुन्ह्यातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाणे अंतर्गत गोळीबार करून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली. त्या दोन जणांना पोलिसांनी अटक केल्यानंतर वरात काढली. त्यावेळी चौकात पोलिसांनी गुंडांनी ज्या भागात त्यांनी दहशत माजवली, त्या भागात त्यांची मिरवणूक काढून दम दिला. या गुन्ह्यातील आरोपींकडून धारदार हत्यार व गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. धिंड काढताना पोलिसांनी आरोपींना सज्जड दम देत इतर गुन्हेगारांनाही इशारा दिला आहे. महिलांची छेडछाड, हवेत कोयते फिरवाल तर भर चौकात मारू असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. याचा व्हिडीओ
सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीमध्ये वाढ
मागील काही महिन्यांपासून पुण्यातील गुन्हेगारी चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सुद्धा पुण्यात शांतता सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारी रोखणे गरजेचे आहे, असं म्हणत पोलिसांना सूचना दिल्या आहेत. तर दुसरीकडे पुण्यातील येरवडा, कोंढवा अनेक परिसरात गेल्या काही दिवसांपासून पोलीस ॲक्शनमोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. कोयते फिरवणे, महिलांची छेडछाड करणे, रोड रोमिओ अशा अनेक गुन्हेगारांवर जरब ठेवण्यासाठी आता धिंड पॅटर्न पाहायला मिळतोय. तर आपली दहशत निर्माण करण्यासाठी अल्पवयीन आरोपींसह सराईत देखील अनेक ठिकाणी गाड्याची तोडफोड, कोयते हातात नाचवत सोशल मिडियावर रिल्स शेअर करतात, त्यांच्यावरती देखील पोलिसांकडून कडक कारवाई केली जात असल्याचं चित्र आहे.
परेड काढूनही कोणाची मस्ती असेल तर…
सगळ्यांना दम देऊनही पोलिसांचे आदेश न मानता सोशल मीडियावर रिल्स पोस्ट (Pune Police) करणं सुरुच असेल आणि परेड काढूनही कोणाची मस्ती असेल तर पोलीसी खाक्या दाखवायला लागेल, असं अजित पवारांनी काही दिवसांपुर्वी म्हटलं होतं. कोणताही गुन्हा करायचा नाही, कोणत्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठींबा द्यायचा नाही, सहभागी व्हायच नाही, गुन्हेगारीच उदात्तीकरण करणारे व्हिडिओ करायचे नाहीत, रिल्स बनवायचे नाहीत, स्टेटस ठेवायच नाही अशा सुचना दिल्या मात्र तरीही या प्रकारचे व्हिडीओ पोस्ट करणं सुरुच आहे. असे प्रकार सुरु असतील तर या सगळ्या गुन्हेगारांना खाक्या दाखवायला हवा, असंही त्यांनी म्हटलं होतं.
अधिक पाहा..
Comments are closed.