अजित पवारांचं परिवार मिलन; संजोग वाघेरेंच्या पत्नीशी चर्चा, उद्धव ठाकरेंना महापालिका निवडणुकीआध
पुणे : पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला काबीज करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार कंबर कसत आहेत. याचं दृष्टीने अजित पवार ( Ajit Pawar) आता उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्का देण्याच्या तयारीत आहेत. आज अजित पवार शहरात आहेत आणि परिवार मिलन घडवत आहेत. याचं प्रसंगी शिवसेनेचे शहराध्यक्ष संजोग वाघेरेंच्या पत्नी उषा वाघेरेंशी अजितदादा आज चर्चा करणार आहेत. त्यामुळं संजोग वाघेरे मशालीच्या हाती पुन्हा एकदा घड्याळ बांधतील अशी चर्चा रंगलेली आहे. मुळात मी शिवसेनेत असलो तरी माझ्या पत्नी आज ही राष्ट्रवादीतचं आहेत आणि मी तूर्त तरी शिवसेनेत आहे. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यावर पाहुयात, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशाचे संकेत ही दिलेत.
मी शिवसेना ठाकरे यांच्या पक्षात काम करतो आहे (Sanjog Waghere)
आजच्या अजित पवारांच्या भेटीमागे वेगळं काही समीकरण आहे का? या प्रश्नावरती एबीपी माझाशी बोलताना संजोग वाघेरे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये अनेक अशी कुटुंबे आहेत, ज्याच्यामध्ये वडील एका पक्षात, मुलगी एका पक्षात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात काम करतो आहे आणि माझी पत्नी तिने माझ्यासोबत पक्ष प्रवेश केला नव्हता. ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे काम आधीपासून करते आणि ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणूक झाली. तेव्हा तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार होतात. तुमच्या विरोधात महायुतीचे श्रीरंग मारणे उभे होते. त्यावेळेला तुमच्या पत्नींनी कोणता धर्म पाळला महायुतीचा धर्म पाळला की पत्नीचा धर्म पाळला? यावरती बोलताना संजोग वाघेरे म्हणाले, त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी बॅलन्समध्ये राहिल्या. त्यांनी दुसऱ्या पद्धतीचं काम केलं नाही. त्यामुळे त्या आता देखील त्याच पक्षात आहेत, असंही त्यांनी पुढे म्हटलं.
पवार आणि वाघेरे कुटुंब यांच्यामध्ये डिनर डिप्लोमसी (संजोग वाघेरे)
महायुतीत आणि महाविकास आघाडीची रंगत आहे. कुटुंबात राजकीय युद्ध सुरू आहे, तारेवरची कसरत करावी लागते आहे का तुम्हाला? याबाबत बोलताना ते म्हणाले, तसं काही नाही लागत करायला. कारण त्या त्यांच्या पक्षाचे काम करतात. मी माझ्या पक्षाचे काम करतो. घरी राजकीय नेते आल्यावरती तुमच्यासमोर पेच निर्माण होतो का यावर ते म्हणाले, नाही आता कसं अजित दादा यांच्या कुटुंबासोबत आमचे अनेक वर्षांचे कौटुंबिक संबंध आहेत. तर ते दरवर्षीप्रमाणे गणपतीमध्ये येतात आणि याही वर्षी ते आले होते. तसे आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि ते राहणे गरजेचे आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान पवार आणि वाघेरे कुटुंब यांच्यामध्ये डिनर डिप्लोमसी झाली. त्यावेळी पासूनच चर्चा रंगायला लागलेली आहे, की संजोग वाघेरे पाटील हे पुन्हा एकदा मशालीच्या हाती घड्याळ बांधणार आहेत? यावर वाघेरे म्हणाले, तसं काही नाहीये, तूर्त तरी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आहे आणि पार्थ दादा यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि त्या कौटुंबिक संबंधामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून ते गणपतीला येतात आणि याही वर्षी ते गणपतीला आले होते. त्यामुळे ते दरवर्षीप्रमाणे येतात आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि ते राहणारच, असं म्हणत त्यांनी सध्या तरी याबाबत चर्चा करणं टाळल्याचं दिसून आलं.
दादांशी एवढं बोलणं होत नाही (संजोग वाघेरे)
आपण जाणार आहात अजित दादांना पुन्हा भेटायला? यावर वाघेरे म्हणाले, मी नाही जाणार. माझ्या पत्नी जातील. परंतु आमचे काही प्रश्न आहेत. ते देण्यासाठी आमची काही मंडळी जातील. जसं की तुम्ही म्हणालात कौटुंबिक संबंध पवार आणि वाघिरे यांचे चांगले आहेत. तर अजित पवारांशी तुमचं बोलणं होतं का? यावर संजोग वाघेरे म्हणाले, नाही दादांशी एवढं बोलणं होत नाही. कामानिमित्त मी दादांना एक दोन वेळा भेटलो होतो. काही समस्या होत्या. त्या समस्या घेऊन पण दादांची मी चर्चा केली. आता काल सुद्धा कामगारांचे प्रश्न आहेत. तर त्या संदर्भात देखील दादांची चर्चा केली असंही त्यांनी म्हटलं आहे.
जाहीर झाल्यानंतर बघूया काय होतं ते(संजोग वाघेरे)
आधी तुम्ही राष्ट्रवादीतच होतात आत्ता दोन-तीन वर्षात तुम्ही इकडे आलेला आहात. तर मग अजितदादा पवार यांच्याशी बोलण्याच्या दरम्यान तुम्हाला परत ये रे पाखरा घरी असं काही सांगणं आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना वाघेरे म्हणाले, तसं काही नाही, कारण दादांनाही माहितीये. माझ्या स्वभाव. त्यांनी तसं काय बोलले नाहीत. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही बदल दिसू शकतो का? या सगळ्या राजकीय घडामोडी घडतात त्या अनुषंगाने? याबाबत बोलताना वाघेरे म्हणाले, अजून महापालिका निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत, जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत तरी आहे. जाहीर झाल्यानंतर बघूया काय होतं ते, असं म्हणत त्यांनी एक प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे आता वाघेरे अजित पवारांसोबत जाणार का? या चर्चांना उधाण आलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.