रेव्ह पार्टीत 22 अन् 23 वर्षांच्या मुली, 42 लाख रुपये, 10 मोबईल अन्…; पोलिसांनी दिली A टू Z म

पुणे रेव्ह पार्टी: हनी ट्रॅपच्या आरोपावर खडसे, महाजनांमध्ये वादंग सुरू आता पुण्यातील एका पार्टीवरून दुसरं वादळ निर्माण झालं. पुण्यातील एका पार्टीवर (Pune Rave Party) काल (27 जुलै) पोलिसांनी धाड टाकली. या  कारवाईत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना अटक करण्यात आली. उच्चभ्रूची वस्ती असलेल्या पुण्यातील खराडीत एका हॉटेलमध्ये ही पार्टी सुरू होती. पण त्यात खडसेंच्या जावयाचं नाव समोर आल्यानं मोठं राजकारण रंगलं आहे. दरम्यान, पोलिसांनी टाकलेल्या या धाडीत नेमकं काय काय घडलं?, याबाबत प्रेसनोटद्वारे माहिती दिली आहे.

पोलिसांच्या प्रेसनोटमधील A टू Z माहिती-

दि.२७/०७/२०२५ रोजी वरिष्ठांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवित असताना मा. निखील पिंगळे पोलीस उप आयुक्त सो, सहा पोलीस आयुक्त, श्री मुळीक साो पोलीस निरीक्षक कुंभार, पोलीस निरीक्षक, संखे, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, महिला पोलीस निरीक्षक वासनिक, महिला पोलीस उपनिरीक्षक लाड गुन्हे शाखा पुणे शहर असे खराडी पोलीस स्टेशन हद्दीत मिळालेल्या गुप्त माहिती प्रमाणे दि.२७/०७/२०२५ रोजी ०३/२० वा चे सुमारास रूम नंबर १०२. स्टेबर्ड अझुर सुट, हॉटेल, खराडी पुणे याठिकाणी इसम नामे १) प्रांजल मनिष खेवलकर, वय ४१ वर्षे, धंदा डॉक्टर, रा. प्लॉट नं. ५७,५८ इंद्रप्रस्त सोसायटी, हडपसर पुणे, २) निखिल जेठानंद पोपटाणी, यय- ३५ वर्षे, धंदा सिगारेट व्यवसाय, रा. सी १०५, डीएसके सुंदरबन, अॅमनोरा पार्क टाउनचे मागे, गाळवाडी रोड, पुणे, ३) समीर फकीर महमंद सय्यद, यय- ४१ वर्षे, धंदा- हार्डवेअर, रा. २०५. हेरीटेज, पॅलेस ओरवड सोसायटी, एनआयबीएम रोड, पुणे. ४) सचिन सोनाजी भोंबे, वय ४२ वर्षे, धंदा-नोकरी, रा. प्लॉट नं. ५१, द्वावारका नगर, डायमंड वॉटर पार्क रोड, वाघोली पुणे. ५) श्रीपाद मोहन यादव, वय २७ वर्षे, धंदा कंट्रक्शन, रा. आनंदी सुंदर निवास बंगला, साई होमसच्या पाठिमागे, पंचतारा नगर, पांडरकर वस्ती, आकुर्डी, पुणे तसेच महिला नामे १) ईशा देवज्योत सिंग, वय २२ वर्षे, रा. ए ६. २०३ कुमार बिर्ला सोसायटी वॉर्ड नंबर ८. नागरस रोड, औध पुणे २) प्राची गोपाल शर्मा वय २३, रा गोदरेज ग्रिन को, म्हाळुंगे पुणे यांचे ताब्यात एकुण ४१,३५,४००/- रू. कि.चा त्यामध्ये २.७० ग्राँग कोकेन सदृश पदार्थ, ७० ग्रॉम गांजा सदृश पदार्थ, एकुन १० मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कार्पोट रोट व दारू व वियरच्या बॉटल, हुक्का प्लेवर असा अमली पदार्थ व इतर साहित्य जप्त करून त्याचे विरुध्द खराडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १५४/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (य) (।।) अ, २१ (ब), २७ कोटपा ७ (२) २०(२), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह. पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, गा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली मा.पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.२, श्री. राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक कुंभार, पोलीस निरीक्षक, संखे, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, महिला पोलीस निरीक्षक बारानिक, महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड व पोलीस अंमलदार गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली आहे.

चित्रा वाघ यांचं ट्विट-

सदर प्रकरणावरुन भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. ओऽऽऽबाबो १२मतीच्या मोठ्ठया ताई…वाचली का पुणे पोलिसांची प्रेसनोट…वाजंत्रीताईचा नवरा प्रांजल खेवलकरच्या रेव्ह पार्टीत तब्बल 42 लाख रुपयांचे कोकेन (ड्रग), गांजा, 10 मोबाईल, गाडी तसेच 22, 23 वर्षाच्या मुलीसोबत होत्या…आता म्हणू नका की हे सत्ताधाऱ्यांचे राजकारण आहे,राजकीय षडयंत्र आहे. जे आहे त्याचे व्हिडिओ पुरावे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहेत, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=qjglbpxwpfw

संबंधित बातमी:

प्रांजल खेवलकर: रेव्ह पार्टी सुरू असलेलं हॉटेल बुकींगही खडसेंच्या जावयाच्या नावावर; 25 ते 28 जुलै पर्यंत होत बुकिंग, पावतीही सापडली

Comments are closed.