मुरलीधर मोहोळांच्या जमीन घोटाळ्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी शनिवारवाडा नमाज प्रकरण तापवलं, इम्


पुणे शनिवार वाडा: पुण्यातील शनिवारवाड्यात काही मुस्लीम महिलांनी नमाज पठण केल्यावरुन सध्या राजकारण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी यावरुन वातावरण तापवणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचा जमीन घोटाळा समोर आल्याने लक्ष विचलित करण्यासाठी शनिवार वाडा प्रकरण समोर आले. महिलेने नमाज वेळ झाल्याने त्यांनी नमाज पडली त्याने काय झाले? त्यांनी दगडाला कलर मारून शनिवार वाडा (Shanivar wada) आमचा असल्याचे म्हटले होते का? शिवाजी महाराजांनी मुस्लीम समाजाला विरोध केला नाही, मग हे कोण चिंधीचोर आहेत? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पॉलिसी आहे की, मुद्दा दुसऱ्याकडे वळवणे. भाजपच्या दबावाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चिंकू पिंकू आले असून हिंदुत्ववादाची धुरा आमच्या खांद्यावर असल्याचे भासवत आहेत. नमाज पडली म्हणजे वाडा ताब्यात घेतला आहे, असे होत नाही. मस्तानीने किती वेळा त्यावेळी तिथे नमाज पडली असेल कुणाला माहीत आहे, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले. ते मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत बोलत होते.

शनिवारवाड्यात आमची बहीण नमाज पडली तर त्याचा एवढा मोठा मुद्दा करण्यात आला. आम्ही कडक शब्दात निंदा करतो की, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मुस्लिम समाजाने शिकले पाहिजे फिरण्यासाठी आलेल्या बहिणी अजान होताच नमाज पडतात. आम्ही ऐकण्यासाठी जन्माला आलो आहेत का? तुम्ही सांगणार आणि आम्ही ऐकणार. तुमची सभा होऊ द्या ,शिव्या देऊ द्या, मग आमची सभा लावू आणि आमचीदेखील जीभ चालेल, असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले.

Bihar Election 2025: बिहारच्या निवडणुकीत एमआयएम सर्वांना आश्चर्याचा धक्का देईल: इम्तियाज जलील

बिहार निवडणुकीत आम्ही सहा जागा मागितल्या होत्या.  भाजपला हरवायचे असेल तर सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. पण निवडणूक लढवू नका, असे तेजस्वी यादव म्हणाले. आता आम्ही बिहारला येत आहोत आणि एमआयएमची ताकद दाखवू. यावेळी बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएम सर्वांना आश्चर्याचा धक्का देईल, असा दावा इम्तियाज जलील यांनी केला. आमच्यासाठी भाजप आहे तेच काँग्रेस आणि आरजीडी आहे. तेजस्वी यादव म्हणतात भाजपचा पराभव करायचे असेल तर एमआयएमने निवडणूक लढवू नयेत. आम्ही काय गोट्या खेळण्यासाठी आहोत का?, असेही जलील यांनी म्हटले.

Mumbai news: एमआयएम पक्षाची महत्त्वाची बैठक

इम्तियाज जलील यांनी मंगळवारी एमआयएम पक्षाच्या मुंबई वगळता इतर जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडल्याचे सांगितले.आम्ही आगामी सर्व निवडणूक लढवणार आहोत, त्यानुसार सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. आमच्या महाराष्ट्र टीमने आज आढावा घेतला आहे. त्यानुसार कुठे किती जागा लढवली जाईल, याचा आम्ही निर्णय घेणार आहे. कुणासोबत युती करावी याबाबत स्थानिक पदाधिकारी निर्णय घेतील. आम्ही ज्यांना उमेदवारी देणार अहोत त्यांना महत्वाचे नियम असणार आहेत. जर दारुण पराभव झाला तर तेथील जबाबदार व्यक्तीला घरचा रस्ता दाखवला जाणार आहे, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

माझा मुलगा नगरसेवक, आमदारसाठी,खासदारकीच्या निवडणुकीसाठी कधी उभा राहणार नाही. एका पिता म्हणून माझे मत आहे की, या घाणेरड्या राजकारणामध्ये माझा मुलगा उतरणार नाही. माझे वैयक्तिक मत आहे, काही पित्यांना वाटत असेल की, राजकारण घाणेरडं असूनही माझा मुलगा जावा तर तो त्यांचा निर्णय आहे, अशी टिप्पणी इम्तियाज जलील यांनी केली.

आणखी वाचा

हिंदू-मुस्लिम भाई भाई, सर्वांचं रक्त लाल; शनिवार वाडा प्रकरणानंतर दादांच्या राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट

आणखी वाचा

Comments are closed.