नराधम दत्ता गाडेचा फोन अश्लील व्हिडीओंनी भरलेला, वर्षात 22 हजार व्हिडीओ पाहिले

पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील (Pune Swargate Rape Case) नराधम दत्ता गाडे (Datta Gade) याच्यासंबंधी एक मोठी माहिती समोर आली आहे. दत्ता गाडेने एका वर्षात एक दोन नव्हे तर तब्बल 22 हजार अश्लील व्हिडीओ पाहिल्याचं त्याच्या गुगल हिस्ट्रीतून (Google Search History) स्पष्ट झालं आहे. दत्ता गाडेच्या मोबाईल फोनमधील गुगल सर्च हिस्ट्री सायबर पोलिसांनी तपासली असता ही माहिती समोर आली. त्यामुळे दत्ता गाडेची विकृत मानसिकता समोर आली आहे.

स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये 25 फेब्रुवारी रोजी एका पीडितेला फसवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. दत्तात्रय रामदास गाडे (वय 37, रा. गुनाट, शिरूर) हा त्या प्रकरणातील आरोपी असून त्याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.

या अत्याचार प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्तांनी हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. गुन्हा केल्यानंतर दत्ता गाडे त्याच्या मुळगावी गुनाट गावामध्ये लपून बसला होता. पुणे पोलिसांनी गुनाट गावातील ग्रामस्थांच्या मदतीने तीन ड्रोन कॅमेरे, श्वान पथकांच्या मदतीने आणि गाडेला ताब्यात घेतलं.

Pune Swargate Rape Case : आरोपीच्या गुगल सर्च हिस्ट्रीचा पंचनामा

पुणे पोलिसांच्या सायबर टीमने आरोपीच्या मोबाइल नंबरवरून त्याची गुगल सर्च हिस्ट्री तपासली. त्यामध्ये आरोपी गाडे वारंवार अश्लील व्हिडिओ पाहात असल्याचे दिसून आले आहे. त्याने एकाच वर्षात 22 हजार अश्लील व्हिडीओ पाहिल्याचं या तपासातून समोर आलं आहे. त्यानंतर आरोपीच्या गुगल सर्च हिस्टरी पंचनामा करण्यात आला.

अत्याचार प्रकरणात 823 पानांचे आरोपपत्र दाखल

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा सध्या येरवडा कारागृहात आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या आरोपपत्रामध्ये 82 साक्षीदार तपासून पाच साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवले आहेत. या प्रकरणी एकूण बारा पंचनामे करण्यात आले असून, पाच महत्त्वाच्या पंचनाम्यांतून आरोपी गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी हजर असल्याचे थेट व घटनेतील भक्कम पुरावे आरोपपत्रात सादर करण्यात आले आहेत. या प्रकरणात पुणे पोलिसांनी एकून 823 पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या खटल्यासाठी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड.अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..

Comments are closed.