पंजाब किंग्जचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पारस म्हांबरे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पंजाब किंग्जने पारस म्हांब्रे यांची नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हिंदुस्थानचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक असलेले म्हांब्रे आता मुख्य प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग यांच्यासोबत काम करतील. पंजाब किंग्जने गेल्या महिन्यात गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ब्रॅड हॅडिन यांच्याशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांनी म्हांब्रे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  म्हांब्रे आणि पॉण्टिंग यांनी यापूर्वी एकत्र काम केले आहे. दोघेही मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षण संघाचा भाग होते. त्यामुळे त्यांचे जुने संबंध पंजाब किंग्जसाठी फायदेशीर ठरू शकतात. म्हांब्रे यांनी तीन वर्षे हिंदुस्थानचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे आणि म्हणून त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी 2021 ते 2024 या काळात राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. या काळात संघ 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.

Comments are closed.