सिंधूची पहिलीच लढत जगज्जेतीशी; डेन्मार्क ओपनमध्ये खडतर आव्हान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूसमोर डेन्मार्क ओपनमध्ये पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू आणि विद्यमान विजेती ऍन से यंग हिचे आव्हान असेल. दक्षिण कोरियाच्या ऍनविरुद्धच्या मागील 10 सामन्यांत सिंधूला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे पराभवाची ही मालिका खंडित करण्याचे तिचे लक्ष्य असेल. सिंधूने जुलैमध्ये जपान ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात तिने अकाने यामागुचीला 21-17, 21-17 असे हरवले होते. आता डेन्मार्कमध्येही विजयी कामगिरी कायम राखण्याचे तिचे आव्हान असेल.

Comments are closed.