विजय क्लबचा दणका
चढायांचा धडाका, पकडींचा सापळा आणि गुणांसाठी जीवघेणी झुंज असलेला खेळ दादरच्या भवानी माता क्रीडांगणावर सुरू असलेल्या 58 व्या शिवनेरी कबड्डी महोत्सवानिमित्त पाहायला मिळाला. विजय क्लबने साऊथ कॅनराला 41-21 असे लोळवले, तर नवोदित संघाने समर्थ स्पोर्ट्स क्लबवर 39-23 अशी मात केली
साऊथ कॅनराच्या गुरुप्रसाद पंडितने हनुमान उडीच्या चढायांनी मैदान गाजवले. मात्र विजय क्लबचा विजयी वार रोखण्यात त्याला यश आले नाही. कुमार गटात अमर क्रीडा मंडळाने गोकुळला 47-6 असे चिरडले, तर श्रीराम विश्वस्त मंडळाने सिद्धी प्रभा फाऊंडेशनवर 47-42 अशी मात केली. महिला गटात स्वामी समर्थने आई महाकालीला 34-7 असे नमवले.
Comments are closed.