छगन भुजबळ म्हणाले, ‘विखार पसरवणाऱ्या विखेंना सोडणार नाही’; राधाकृष्ण विखेंची पहिली प्रतिक्रिया,
Radhakrishna Vikhe Patil on Chhagan Bhujbal: विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला, अशी टीका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी बीडच्या महाएल्गार सभेत केली. तसेच विखे पाटील हे गरज नसताना मनोज जरांगेंकडे (Manoj Jarange) जातात. भाजपच्या (BJP) लोकांना मला सांगायचे आहे की, तुमच्या लोकांना आवरा. मराठा समाज आणि आमच्या अंतर पडले ते अंतर अंतरवलीच्या दरीद्री पाटलामुळे पडले आहे. जरांगे-पाटील यांच्याशी वारंवार भेटीगाठी घेणाऱ्या विखेंना सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आता यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, माझी भूमिका स्पष्ट करायची आहे की, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाचा विषय केला आहे. भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत मी त्यांचा आदर करत आलो आहे. सार्वजनिक जीवनात काम करत असताना ओबीसी-मराठा वातावरण मला कधी वाटलं नाही. आता 5 कोर्टात जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात सगळे एकत्र राहतात. सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात. आता दिवाळी साजरी करत आहोत. ओबीसी दिवाळी आणि मराठा दिवाळी असं कधी झालं आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Radhakrishna Vikhe Patil on Chhagan Bhujbal: भुजबळांना भेटून गैरसमज दूर करणार
राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की, आमच्या डीएनएमध्ये ओबीसी आहे. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये. कायद्याचा चौकटीत बसवून मराठ्यवाड्यातील मराठा समाजाचा विषय मार्गी लावला आहे. मी भुजबळांना भेटणार आहे आणि त्यांना समजून सांगणार आहे. सोबत न्यायमूर्ती शिंदे यांना घेऊन जाणार आहे. ते त्यांना सगळं समजून सांगतील आणि त्यांचा गैरसमज दूर केला जाईल, असे त्यांनी म्हटले.
Radhakrishna Vikhe Patil: दिवाळी संपल्यावर ओबीसी नेत्यांना बोलावणार
जरांगे पाटील यांनी प्रामाणिकपणे आंदोलन चालवलं. त्यांनी निस्वार्थीपणे आंदोलन केलं. आम्ही जे काही केलं आहे ते कायद्याच्या चौकटीत बसवून तो विषय मार्गी लावला आहे. तुम्ही त्यांचे शिक्षण काढत आहात हे चुकीचं आहे. या पुढाऱ्यांना त्यांची दिवाळी साजरी करायची आहे. दिवाळी संपल्यावर ओबीसी नेत्यांना बोलावणार आणि न्यायमूर्ती शिंदे यांना बोलवून त्यांना विषय समजून सांगणार आहोत, असे देखील राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केले.
Radhakrishna Vikhe Patil: विखे पाटलांचा शरद पवारांवर निशाणा
राज्य सरकारने शेतकऱ्यांना केलेल्या मदतीनंतर पवारांच्या राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतलाय. राज्यभर पवारांच्या राष्ट्रवादीने आंदोलन करत काळी दिवाळी साजरा केलीय. ओला दुष्काळ जाहीर करावा तसंच कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. याबाबत विचारले असता राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्यासमोर मोठ संकट आलं होतं. 32 हजार कोटी रुपयांच पॅकेज जाहीर केलं. मग शरद पवार यांना कसली अस्वस्थता आहे. आता लोकं त्यांना मानत नाही. त्यामुळे स्वतः अस्तित्व जपण्याचा शरद पवारांचा प्रयत्न सुरू आहे.शरद पवार यांना सांगायचं आहे की, आपण मुख्यमंत्री असताना कारखान्याकडून सक्तीने पैसे वसूल केले. तुम्ही वसंतदादा शुगरकडून पैसे वसूल करता मग ते तुम्हाला चालते. मग सरकारने पैसे घेतले तर काय अडचण आहे? असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
आणखी वाचा
भुजबळला फडणवीस आणि अजितदादांना बदनाम करायचंय, जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले माझ्या नादी लागू नको
आणखी वाचा
Comments are closed.