राधे राधेने सुरुवात, जय श्री रामने शेवट…; रघूच्या चिठ्ठीत काय लिहिलेलं?, सूर्यकुमारसह सगळे वा
रघु शर्मा MI विरुद्ध LSG IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) काल मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (MI vs LSG) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने जोरदार कमबॅक करत 6 विकेट्सने विजय मिळवला.
मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून खेळणारा फिरकीपटू गोलंदाज रघू शर्माने (Raghu Sharma) सगळ्याचं लक्ष वेधलं. मुंबई इंडियन्सने या हंगामात अनेक खेळाडूंना संधी दिली आहे. असाच एक खेळाडू म्हणजे लेग-स्पिनर राघू शर्मा, ज्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या मागील सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आज वानखेडे स्टेडियमवर त्याने लखनौविरुद्ध सामना खेळला आणि आपली पहिली विकेट मिळवली. आपली पहिली विकेट घेतल्यानंतर, राघूने आपल्या खिशातून कागदाची एक चिठ्ठी बाहेर काढली, ज्यावर एक संदेश लिहिलेला होता. त्याचा हा संदेश आता सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. (Raghu Sharma MI vs LSG IPL 2026)
मैदानात नेमकं काय घडलं? (Raghu Sharma MI vs LSG IPL 2026)
लखनौकडून अक्षत रघुवंशीने मुंबईविरुद्ध पर्दापण केले. पर्दापणाच्या या पहिल्या सामन्यात अक्षत रघुवंशीला 7 चेंडूत 11 धावा केल्या. मात्र अक्षतला मोठी खेळी खेळता आली नाही. रघू शर्माने अक्षतला आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढले आणि आयपीएलमधील पहिली विकेट पटकावली. 13 षटकाच्या अगदी पहिल्याच चेंडूवर अक्षतला झेलबाद करून राघवने आपली पहिली आयपीएल विकेट मिळवली. त्यानंतर, विकेटचा आनंद साजरा करत असताना, राघूने आपल्या खिशातून तो संदेश लिहिलेली कागदाची चिठ्ठी बाहेर काढली. त्या संदेशाचा शेवट “जय श्री राम” या शब्दांनी झाला होता. रघूने काढलेल्या या चिठ्ठीमध्ये नेमकं काय लिहिलंय हे पाहण्यासाठी सूर्यकुमार यादवही रघूच्या जवळ गेला आणि चिठ्ठी वाचत बसला.
रघुने रघुवंशी विरुद्ध विजय मिळवला
युवती #TATAIPL रघु शर्माची विकेट 👏
अपडेट्स ▶️ https://t.co/elXSOvaeig #खेलबिंदास | #MIvLSG pic.twitter.com/GhjZxPKWc1
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 4 मे 2026
रघूने चिठ्ठीत काय लिहिलं होतं? (Raghu Sharma Note MI vs LSG IPL 2026)
विकेट पटकवल्यानंतर रघू खिशातून एक चिठ्ठी काढली. यामध्ये “राधे-राधे. आज गुरुदेवांच्या कृपेने, 15 वर्षांचा एक वेदनादायी प्रवास संपुष्टात आला आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मुंबई इंडियन्सचे आभार. जय श्री राम…असं लिहिलं होतं.
#रघुशर्मा त्या विकेटसह विधान करतो 🔥
अनेक वर्षांची मेहनत आणि विश्वास अखेर फळाला येत आहे. 💙🙌🏻#TATAIPL रिव्हेंज वीक २०२६ ➡️ #MIvLSG | आता थेट 👉https://t.co/hc4PVkY1Pc pic.twitter.com/QFbQB1OeRg
— स्टार स्पोर्ट्स (@StarSportsIndia) 4 मे 2026
मुंबई आणि लखनौचा सामना कसा राहिला? (MI vs LSG IPL 2026)
लखनौ सुपर जायंटसनं प्रथम फलंदाजी करताना 228 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रेयान रिकल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी 143 धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील सर्वात मोठी पाचवी भागीदारी होती. रेयान रिकल्टन 83 धावांवर बाद झाला. तर, रोहित शर्मानं देखील 84 धावा केल्या. रिकल्टन यानं 6 चौकार आणि 8 षटकार मारले. तर, रोहित शर्मानं 6 चौकार आणि 7 षटकार मारले. एम. सिद्धार्थनं रोहित शर्माला बाद केलं. रोहित शर्मा बाद झाला तेव्हा त्यांना 6 ओव्हरमध्ये 52 धावा करायच्या होत्या. सूर्यकुमार यादव देखील मोठी धावसंख्या करु शकला नाही. नमन धीर यानं मुंबईला विजयापर्यंत पोहोचवलं. मुंबईनं 18.4 ओव्हरमध्ये 4 बाद 229 धावा केल्या. लखनौ विरुद्ध झालेला विजय मुंबईसाठी तिसरा विजय ठरला.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.