पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींचा दारुण पराभव, राहुल गांधींचा धोक्याचा इशारा, म्हणाले.
पश्चिम बंगाल निवडणूक निकाल 2026 वर राहुल गांधी: सोमवारी (दि. 05) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election Result 2026) भाजपने (BJP) 207 जागा जिंकत ऐतिहासिक मुसंडी मारली आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसचा (TMC) मोठा पराभव झाला असून तरी या निकालावर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संतप्त प्रतिक्रिया देत धोक्याचा इशारा व्यक्त केलाय. “हा केवळ एका पक्षाचा पराभव नसून भारतीय लोकशाही नष्ट करण्याच्या दिशेने भाजपने टाकलेले हे मोठे पाऊल आहे,” असा खळबळजनक दावा राहुल गांधींनी केला आहे.
Rahul Gandhi on West Bengal Election Result 2026: पराभवावर आनंद साजरा करणाऱ्यांना खडेबोल
राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत आपल्याच काँग्रेस पक्षातील आणि इतर विरोधी पक्षांतील नेत्यांना सुनावले आहे. ते म्हणाले, “काँग्रेसमधील काही लोक आणि इतर काही जण तृणमूल काँग्रेसच्या पराभवावर आनंद साजरा करत आहेत. त्यांनी हे नीट समजून घेतले पाहिजे की, आसाम आणि बंगालमधील जनमताची ही चोरी आहे. भारतीय लोकशाही नष्ट करण्याच्या भाजपच्या मोहिमेतील हे एक मोठे पाऊल आहे. क्षुल्लक राजकारण बाजूला ठेवा, ही लढाई केवळ एका पक्षापुरती मर्यादित नसून भारतासाठी आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसमधील काही, तर काहीजण टीएमसीच्या पराभवाबद्दल आनंद व्यक्त करत आहेत.
त्यांनी हे स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे – आसाम आणि बंगालच्या जनादेशाची चोरी हे भारतीय लोकशाही नष्ट करण्याच्या भाजपच्या ध्येयाने पुढे गेलेले एक मोठे पाऊल आहे.
क्षुल्लक राजकारण बाजूला ठेवा. हे एका पक्षाबद्दल नाही किंवा…
—राहुल गांधी (@RahulGandhi) 5 मे 2026
Rahul Gandhi on West Bengal Election Result 2026: इतर राज्यांच्या निकालांचा दिला संदर्भ
दरम्यान, गेल्या 24 तासांत राहुल गांधी यांनी दुसऱ्यांदा ममता बॅनर्जी यांची पाठराखण केली आहे. सोमवारी देखील त्यांनी ट्विट करत हटले होते की, आसाम आणि बंगाल ही निवडणूक भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने ‘चोरल्याची’ स्पष्ट उदाहरणे आहेत. आम्ही ममता दीदींशी सहमत आहोत. बंगालमध्ये 100 हून अधिक जागा ‘चोरल्या’ गेल्या. मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि 2024 ची लोकसभा निवडणूक ज्या पद्धतीने हाताळली गेली, त्याच पद्धतीने बंगालचा निकाल फिरवला गेल्याचा आरोप त्यांनी केला होता.
आसाम आणि बंगालमध्ये निवडणूक आयोगाच्या पाठिंब्याने भाजपने चुराडा केल्याची स्पष्ट प्रकरणे आहेत.
ममताजी यांच्याशी आम्ही सहमत आहोत. बंगालमध्ये 100 हून अधिक जागा चोरीला गेल्या.
आम्ही हे प्लेबुक आधी पाहिले आहे:
Madhya Pradesh.
हरियाणा.
महाराष्ट्र.
लोकसभा 2024 इनिवडणुकीत चोरी,…
—राहुल गांधी (@RahulGandhi) 4 मे 2026
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.