राहुल गांधींची भाजप आणि आरएसएसवर टीका

अर्धनारीश्वराचा फोटो शेअर करत साधला निशाणा : भाजपचेही प्रत्युत्तर

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी त्यांना असंस्कृत, लोभी, जातीयवादी आणि पुरुषप्रधान असे संबोधत भारताच्या आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरांचे कोणतेही ज्ञान नसल्याचा आरोप केला आहे. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टद्वारे ही टीका करताना राहुल गांधी यांनी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे अर्धनारीश्वर रूप दर्शवणारे एक चित्रही शेअर केले. या पोस्टनंतर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार शाब्दिक संघर्ष सुरू झाला आहे.

सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी आपल्या आई-वडिलांच्या नात्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांनी ही टिप्पणी केली. या वक्तव्यामुळे त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. आता राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्या कडक शब्दात समाचार घेतला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही काँग्रेस नेत्यावर निशाणा साधला. दुसरीकडे, काँग्रेस पक्षाने राहुल गांधींच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

Comments are closed.