भाजपची प्रसिद्धीची हाव! शववाहिनीवर राहुल नार्वेकर यांचा फोटो
भाजप नेत्यांची प्रसिद्धीची हाव इतकी वाढली आहे की आता शववाहिनीवर देखील त्यांचे फोटो छापून घेतले जात आहेत. सध्या सोशल मीडियावर एका शववाहिनीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या शववाहिनीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरही भाजप नेत्यांचे फोटो आहेत.
कुलाबा विधानसभा मतदारसंघात राहुल नार्वेकर यांच्या माध्यमातून अंत्ययात्रेसाठी शववाहिनी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे फोटो देखील या शववाहिनीवर आहेत.
Comments are closed.