बॉम्बस्फोट प्रकरणी बंगालमध्ये तीन ठिकाणी छापे टाकले

बॉम्ब तयार करणारे दोन आरोपी गजाआड

कोलकाता:

एनआयएने पश्चिम बंगालच्या अमता भागात छापे टाकून दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई 2022 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी केली आहे. या स्फोटात बॉम्ब तयार करणाऱ्यांपैकी एकाचा मृत्यू झाला होता आणि तीन जण जखमी झाले होते. हावडा येथील अमता भागात राहणाऱ्या असफार मि•dया आणि एंताजुल मि•dया यांना एनआयएने अटक केली आहे. आरोपींच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. असफार आणि एंताजुल यांच्या निर्देशावरच 23 फेब्रुवारी 2022 रोजी चंद्रपूर बाजारानजीक अवैध स्वरुपात देसी बॉम्ब तयार केले जात होते.

बॉम्ब तयार करताना झालेल्या स्फोटांमध्ये जहधर मोल्ला, मोहब्बत मोल्ला, मोइनुर रहमान आणि एस.के. महरम गंभीर जखमी झाले होते. यातील महरम याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. बॉम्बद्वारे परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा असफार आणि एंताजुल यांचा कट होता.

Comments are closed.