शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, ‘जाचक अटींमुळे सरकारची प्रत
बच्चू कडू मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेतील (Farmer Loan Waiver) जाचक अटी, प्रोत्साहन अनुदानाची मर्यादा, ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) योजना आणि प्रलंबित लाभांच्या वितरणावरून शिवसेनेचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विधानपरिषदेत कर्जमाफीतील त्रुटीवरून जोरदार टीका केली. कर्जमाफीच्या अंमलबजावणीत असलेल्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे सरकारची प्रतिमा खराब होत असून जनतेचा रोष वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच कर्जमाफीसाठी आणि प्रोत्साहन अनुदानासाठी लावलेल्या अटी तातडीने रद्द केल्या पाहिजेत. 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहन रकमेऐवजी एक लाख रुपये देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही कडू यांनी केली. (Bacchu Kadu on Farmer Loan Waiver)
Bacchu Kadu : शेतकऱ्यांची नावे कर्जमाफी यादीत आली, पण प्रत्यक्षात…
नियम 260 अन्वये कर्जमाफीच्या अनुषंगाने विधानपरिषदेत उपस्थित चर्चेत बोलताना कडू यांनी ओटीएस योजनेबाबत संभ्रम असल्याचे सांगत त्यांनी सरकारकडे स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केली. राज्य सरकारच ओटीएस योजना राबवत असताना बँकांवर जबाबदारी ढकलली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उदाहरणाचा उल्लेख करत, व्याजमाफीसारखे निर्णय राज्यभरातील सहकारी बँकांनी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कडू यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांचे प्रलंबित लाभ अद्याप वितरित न झाल्याचा मुद्दाही उपस्थित केला. शेतकऱ्यांची नावे कर्जमाफी यादीत आली, पण प्रत्यक्षात बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे नवीन कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. काही शेतकऱ्यांना न्यायालयात जावे लागले आहे. सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे सरकारची बदनामी होत असल्याचा आरोप करत त्यांनी कर्जमाफी प्रक्रियेत अधिक सुलभता आणण्याची गरज व्यक्त केली. तर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी अॅग्रीस्टॅकमध्ये शेतकऱ्यांची सर्व माहिती उपलब्ध असताना पुन्हा केवायसीची सक्ती का केली जाते, असा सवाल उपस्थित केला.
Dattatray Bharne: कर्जमाफीची प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू
दरम्यान कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले , मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारमधील सर्व मंत्री शेतकरी कुटुंबातून आलेले असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींची पूर्ण जाणीव सरकारला आहे. राज्य सरकारने कठीण आर्थिक परिस्थितीतही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, कर्जमाफीची प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चर्चेच्या शेवटी सभापतींनी हा विषय अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत कृषी, सहकार आणि संबंधित विभागांनी सर्व आमदारांसोबत विभागनिहाय बैठका घेऊन प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढावा, असे निर्देश दिले. तसेच अधिवेशन संपण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
इतर महत्वाच्या बातम्या
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!
Comments are closed.