धक्कादायक घटनेनं रायगड हादरलं, पेणच्या पाटनेश्वर आदिवासीमध्ये 5 वर्षीय मुलीला संपवलं

रायगड क्राईम न्यूज : रायगड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका 5 वर्षीय मुलीची हत्या झाल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. पेण मधील पाटनेश्वर आदिवासी मध्ये ही घटना घडली आहे. रिया सागर वाघमारे या 5 वर्षीय मुलीचे अपहरण करुन हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

हत्येप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु

रायगड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पेन मधील पाटनेश्वर आदिवासी वाडीतील एका 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीला पेण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किरण भिकू वाघमारे अस संशयित आरोपीचे नाव असून पोलिस या प्रकरणी चौकशी करत असून, या हत्येप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Comments are closed.