पीने वालो को पीने का बहाना चाहिए, रायगडात वर्षभरात मद्यपीनी रिचवली 5 कोटी लिटर दारू; बिअरची सर्वाधिक विक्री

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रतीकात्मक फोटो

‘पीने वालो को पीने का बहाना चाहिए’ असे म्हटले जाते. त्यामुळे मद्य उत्पादन शुल्कात कितीही वाढ झाली तरी मद्य पिणाऱ्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. पर्यटननगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या आर्थिक वर्षात तब्बल 4 कोटी 14 लाख 14 हजार 611 लिटर दारू तळीरामांनी रिचवली आहे. यामध्ये बिअरची विक्री सर्वाधिक झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क रायगड विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या मद्यनिर्मिती कंपन्या, मद्याच्या दुकानांमध्ये येणारे मद्य, बारमध्ये विक्रीसाठी येणारे मद्य यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग बारकाईने लक्ष ठेवून असते. बनावट आणि भेसळ दारू बाजारात येऊ नये यासाठी प्रशासनाचा वॉच असतो. मागील काही वर्षांमध्ये मद्याच्या उत्पादन शुल्कात मोठी वाढ झाली आहे. मात्र त्याचा कोणताही परिणाम मद्य बनवणे व मद्य विक्रीवर झालेला नाही. 2025–26 या आर्थिक वर्षात जिल्ह्यात 4 कोटी 14 लाख 14 हजार 611 बल्क लिटर मद्य विक्री झाली आहे.

65 लाख लिटरची वाढ
2024–25 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2025–26 या आर्थिक वर्षात 65 लाख 33 हजार 781 बल्क लिटर इतकी मद्य विक्री वाढ झाली आहे. 2024–25 या आर्थिक वर्षात 4 कोटी 29 लाख 60 हजार 781 बल्क लिटर इतकी मद्य विक्री झाली होती. तर 2025–26 या आर्थिक वर्षात 4 कोटी 14 लाख 14 हजार 611 बल्क लिटर मद्य विक्री झाली.

Comments are closed.