फेसबुक मित्राने केला घात, शरीरसंबंध ठेवत विवाहितेला जाळ्यात अडकवलं, अडीच वर्षे दिल्या नरकयातना,
महाड : रायगड जिल्ह्यातील महाड (raigad mahad crime) तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरील मैत्री एका विवाहित महिलेला चांगलीच महागात पडली आहे. फेसबुकवर ओळख झालेल्या एका तरुणाने तिच्याशी जवळीक वाढवत वारंवार अत्याचार (raigad mahad crime) केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या अडीच वर्षांपासून पीडितेला धमकावत तिचं लैंगिक शोषण करत होता. सुरुवातीला ओळखीतून सुरू झालेली ही मैत्री हळूहळू ब्लॅकमेलिंग आणि अत्याचारात (raigad mahad crime) बदलली. आरोपीने पीडितेचे काही खाजगी फोटो आणि व्हिडिओचा वापर करून तिला धमकावले, तसेच तिला मौन बाळगण्यास भाग पाडले. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं धैर्य एकवटत महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.(raigad mahad crime)
RAGAD महाड गुन्हा: फेसबुक प्रदेश ओळखले An.
पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून, तिची ३८ वर्षीय आरोपीसोबत फेसबुकवरती ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचबरोबर आरोपीने अत्यंत घृणास्पद वर्तणूक केली. त्याने महिलेसोबतचे शारीरिक संबंध ठेवत असताना त्याचे व्हिडीओ देखील मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतले, तसेच तिचे फोटोही काढले. या फोटोंचा आणि व्हिडीओचा वापर करून आरोपीने विवाहीत महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याचीही धमकी दिली. या धमक्यांमुळे घाबरलेल्या महिलेनं निमूटपणे आरोपीचे अत्याचार सहन करत राहिली.
raigad mahad crime: दडपशाहीनंतर अखेरा महिलांनी धीर दिला.
या अडीच वर्षांच्या काळात आरोपीने पीडितेच्या गोरेगाव येथील राहत्या घरात तसेच मुंबईतील विक्रोळीतील स्वतःच्या निवासस्थानी वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या काळात आरोपीकडून झालेल्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे पीडिता तीव्र तणावाखाली होती. दीर्घकाळ चाललेल्या अत्याचारानंतर अखेर महिलेनं धैर्य दाखवत महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी ३८ वर्षीय आरोपीला तात्काळ अटक केली आहे. या प्रकरणामुळे महाड तालुक्यात खळबळ उडाली असून, महाड शहर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.