स्वातंत्र्यदिनी दिल्लीत पावसाचा अंदाज.
लाल किल्ल्यावरील सोहळ्यावेळीही पाऊस कोसळण्याची शक्यता
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन सोहळा 15 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. यावेळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील मुख्य सोहळ्यावेळी पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने यासंबंधी स्पष्ट अंदाज वर्तवला असून शनिवारी लाल किल्ल्याच्या परिसरात सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सकाळच्या सुमारास सोहळ्याच्या तयारीवेळी आणि पाहुण्यांच्या आगमनावेळी हलक्या पावसामुळे कार्यक्रमाच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो.
दिल्लीसह आजुबाजुच्या परिसरात शनिवारी दिवसभर हलक्या पावसाच्या अनेक सरींची शक्यता आहे. हवामान विभागाने सततच्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला नाही, परंतु प्रामुख्याने अतिशय हलका ते अगदी हलका पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवला आहे.
स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी जेव्हा राष्ट्रपती आणि पंतप्रधान सोहळ्याला उपस्थित राहतील आणि पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करतील, तेव्हा पावसाची दाट शक्यता असल्यामुळे आयोजक आणि सुरक्षा यंत्रणांना त्यांच्या तयारीमध्ये अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागणार आहे. 14 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30 ते 11:30 दरम्यान पाऊस पडण्याची 80 टक्के शक्यता आहे. या वेळेत चार ते सहा मिलीमीटर पाऊस अपेक्षित आहे. तसेच, पहाटे 5:30 ते 8:30 दरम्यानही जवळपास तितकाच पाऊस अपेक्षित असून, त्याची 70 टक्के शक्यता आहे.
Comments are closed.