राज ठाकरेंनी समारोपापूर्वी एक गोष्ट सुधारली, महादेव जानकर ते दीपक पवार सर्वांना मंचावर बोलावलं
मुंबई : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारनं पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर वरळीतील डोममध्ये विजयी मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर मराठीवर प्रेम करणारे लोक मुंबईतील वरळीतील डोममध्ये दाखल झाले होते. या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भाषणं झाली. राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात सन्माननीय उद्धव ठाकरे म्हणत केली. यानंतर त्यांनी मराठीच्या संदर्भातील मुद्यांवर सविस्तर भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांचं भाषण संपल्यानंतर राज ठाकरे पुन्हा बोलायला उभे राहिले अन् मुख्य भाषणावेळी राहिलेली गोष्ट त्यांनी दुरुस्त केली.
राज ठाकरे पुन्हा भाषणाला उभे राहिले अन् …
राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचं भाषण संपल्यानंतर पुन्हा बोलायला उभे राहिले आणि म्हणाले, मला माफ करा, मगाशी माझ्या भाषणात ओघात या लढ्यात जे जे पक्ष सहभागी झाले त्यांची नावं घ्यायला विसरलो. माझी विनंती आहे म्हणत राज ठाकरे यांनी कॉ. प्रकाश रेड्डी, सुप्रियाताई सुळे, कॉ. अजित नवले, जितेंद्र आव्हाड, महादेवराव जानकर, शेकापचे जयंत पाटील, भालचंद्र मुणगेकर यांना मंचावर बोलावलं. मराठी भाषा केंद्राचे दीपक पवार, विनोद निकोले यांना मंचावर बोलावलं. यानंतर सर्वांनी मराठी भाषेच्या लढ्यासाठीचा जल्लोष केला. यानंतर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना देखील मंचावर बोलावण्यात आलं.यानंतर संजय राऊत यांना देखील मंचावर बोलावण्यात आलं.
या ऐतिहासिक क्षणाच्या वेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय देखील मंचावर आले आणि त्यांनी एकत्रित फोटो काढले.
https://www.youtube.com/watch?v=bpnaase9ygy
मोर्चा निघायला पाहिजे होता : राज ठाकरे
सन्माननीय उद्धव ठाकरे, जमलेल्या सर्व तमाम मराठी भगिनींनो बांधवांनो मातांनो, खरंतर दोघांची भाषणं संपली की एकत्र आरोळ्या ठोका, खरंतर आज मोर्चा निघायला पाहिजे होता, मराठी माणूस कसा सर्व बाजूनं एकवटतो याचं चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं, नुसत्या मोर्चाच्या चर्चेनं माघार घ्यावी लागली, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले की एका मुलाखतीत म्हटलं होतं की, कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव व्यासपीठावर एकत्र येत आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, बऱ्याच चॅनेलचे कॅमेरे जमले आहेत, संध्याकाळी सगळं सुरु होईल, काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती, कोणी हसलं का, काय बोलतात का?मूळ विषय सोडून इतर गोष्टीत इंटरेस्ट असतो, असं राज ठाकरे म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.