राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेबावरही सूचना
मुंबई : राज्यात छावा सिनेमाच्या प्रदर्शनानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच, नागपूरमध्ये दोन गटांत हिंसाचाराची घटना घडल्याने राज्य सरकारनेही काही ठोस पाऊल उचलली आहेत. नागपूरमधील (Nagpur) हिंसाचाराच्या घटनेवर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. राजकीय पक्षाचे नेतेही आपल्या भावना व्यक्त करत असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत देखील औरंगजेबाची कबर आणि नागपूरमधील घटनेचा उल्लेख करण्यात आला. यावेळी, राज ठाकारानी इराज ठाकरे) पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत मनसेच्या नवीन रचनेबद्दल देखील माहिती दिली. मनसेची पदाधिकाऱ्यांची बैठक दादर येथील सावरकर सभागृहात पार पडली, या बैठकीला राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले.
वरळीतील मेळाव्यात राज ठाकरे यांनी पक्षाची नवी रचना करण्यासंदर्भात भूमिका मांडली होती. त्यानुसार, आता मनसे पक्षात होणार नवे फेरबदल होणार असून 23 मार्चला मनसेच्या पक्षाची नवी रचना समोर येणार आहे. राज ठाकरे यांनी आजच्या बैठकीत महाराष्ट्रातील राजकारणात सुरू असलेल्या औरंगजेब मुद्द्यावर पधाधिकाऱ्यांसमोर भूमिका मांडली. यांना औरंगजेब आत्ता आठवला. पण, छावा कादंबरीचा संदर्भ देत राज ठाकरेंनी बैठकीत नागपूर प्रकरणावरही भाष्य केलं. छावा कादंबरी शिवाजी सावंत यांनी 60 वर्षांपूर्वी लिहिली पण आता सिनेमा आला आणि या सर्वांना आता औरंगजेब आठवला, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
दरम्यान, गुढी पाडवा येत्या 31 मार्च रोजी साजरा होत असून मनसेचा मेळावा पाडव्यानिमित्त घेण्यात येतो. मराठी नववर्षानिमित्ताने मनसेचा दरवर्षी पाडवा मेळावा असतो, या मेळाव्याकडे मनसैनिकांचे लक्ष असून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याकडे पाहिले जाते. तत्पूर्वी या पाडवा मेळाव्याअगोदरच 23 मार्च रोजी मनसेच्या पक्षात काही महत्त्वाची फेररचना होणार आहे. मात्र, ती नेमकी काय, हे तेव्हाच समजेल.
कुंभस्नान भूमिकेवर राज ठाकरे ठाम
राज ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्त भाषण करताना प्रयागराजमधील कुंभमेळ्यातील कुंभ गंगास्नानावर टिप्पण्णी केली होती. त्यावरुन, महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले. गंगेच्या वक्तव्यावर मी ओघाने बोललो असलो तरी विचार करून बोललो, अशी भूमिका राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांसमोर मांडली.
हेही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.