महाराष्ट्रात माणसाचे लिलाव सुरु, बाळासाहेब नाहीत ते बरं झालं, नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे : आज बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आहे. या निमित्त आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. आता आज राजकारणात गुलामांचा बाजार झाला आहे. बाळासाहेब नाहीत ते बरे आहे. तो माणूस व्यथित झाला असता. महाराष्ट्रमध्ये माणसाचे लिलाव सुरु आहेत असे परखड मत राज ठाकरे यां नी व्यक्त केलं.
महाराष्ट्रामध्ये माणसाचे लिलाव सुरु
बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मी आज सामनामध्ये लेख लिहिला आहे. त्यांच्याबद्दल बोलायचं तर मी आणि उद्धव तासन तास बोलू शकतो असे राज ठाकरे म्हणाले. जेव्हा हा माणूस व्यंगचित्र काढायचा तेव्हा जी समाधी लागण आहे ना ते पाहिल्याचे राज ठाकरे म्हणाले. ती व्यंगचित्रं नव्हती ती समाधी होती. बाहेर आंदोलन दंगल असायची मात्र हे तल्लीन व्हायचे असेही राज ठाकरे म्हणाले. हे येत कुठून? आला कुठून. देशातल्या राजकारणामधून हा वेगळा माणूस होता. जगात असा कोणताही माणूस आर्टिस्ट तयार झाला नाही, त्याच्याबद्दल बाहेर काही चालु द्या ते आपली कला घडवायचे असे राज ठाकरे म्हणाले. आज देशात आणि महाराष्ट्रात गुलामांचा बाजार निर्माण झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी या गोष्टी घडत आहेत. मुंबईसह कल्याण डोंबिवली आणि इतर ठिकाणचा बाजार पाहून अक्षरशः शिसारी आली. आत्ता राजकरणात गुलामांचा बाजार झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. बाळासाहेब नाहीत ते बरे आहे. तो माणूस व्यथित झाला असता. महाराष्ट्रामध्ये माणसाचे लिलाव सुरु आहेत असे राज ठाकरे म्हणाले. कल्याण डोंबिवली असेल किंवा इतर जिल्ह्यात हे सुरु आहे असे राज ठाकरे म्हणाले.
पक्ष सोडणं हे माझ्यासाठी नव्हतं, ते घर सोडणं होतं.
जुनी आठवण सांगताना राज ठाकरे म्हणाले की, “मी ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलो त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी पक्ष सोडणं हे माझ्यासाठी नव्हतं, ते घर सोडणं होतं. त्यानंतर मला आणि उद्धवला अनेक गोष्टी उमजल्या. झालं गेलं ते आता सोडून द्या एकदा. एकदा बाळासाहेब ठाकरे या विषयावर मला एकदा व्याख्यान द्यायला आवडेल. त्या माणसाचे सगळे पैलू मला मांडायला आवडेल. हत्तीच्या गोष्टीप्रमाणे बाळासाहेब प्रत्येकाला वेगवेगळे वाटतात, पण जगाला ते कळलेच नाही असं राज ठाकरे म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.