वरळीत ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा, शिंदेंच्या ‘जय गुजरात’ला उत्तर मिळणार?
राज ठाकरे उधव ठाकरे विजय रॅली: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे ठाकरे बंधू तब्बल एकोणीस वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. वराई डोममध्ये आज होणाऱ्या या मेळाव्याच्या निमित्ताने ते एकत्र तोफ डागणार आहेत. पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावरून सरकारने काढलेला जीआर मागे घेण्यास भाग पाडल्यानंतर हा विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून ठाकरे बंधू सरकारवर जोरदार टीका करणार हे निश्चित आहे. एकनाथ शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेने आणि सुशील केडे यांच्या वक्तव्याने या टीकेला आणखी धार येणार आहे. ठाकरे बंधूंनी हिंदीच्या मुद्द्यावर एकत्र आंदोलनाची हाक दिली होती आणि अखेर सरकारला तो जीआर मागे घ्यावा लागला होता. आता या विजयी मेळाव्यातून ते आपली पुढील भूमिका स्पष्ट करतील आणि सरकारला आव्हान देतील, सोबतच नव्या राजकीय समिकरणाची नांदी आज बघायला मिळणार का? ही उत्सुकता राजकीय वर्तुळासह तमाम महाराष्ट्रवासीयांना लागली आहे.
विजयी मेळावा नेमका कसा असेल?
विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. आज सकाळी 11.30 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे डोम ला पोहोचतील. दरम्यान, या विजयी रॅलीत कोणकोणते नेते भाषण करणार आहेत, याबाबतची माहिती मिळाली आहे. आजच्या विजयी मेळाव्यात प्रकाश रेड्डी, जयंत पाटील (शेतकरी पक्ष), सुप्रिया सुळे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे अशी भाषणं होणार आहेत. जर काँग्रेसचे नेते आले तर त्यांना देखील भाषण करण्याची संधी दिली जाणार आहे. शेवटचं भाषण उद्धव ठाकरे यांचं असणार आहे. डोमच्या बाहेर हाजी अली, वरळीला जाणारे दोन्ही रस्ते पॅक होतील. तिथे स्क्रीन लावली जाणार आहे. बहुदा दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले जाण्याची शक्यता आहे.
https://www.youtube.com/watch?v=M4vfws7i8uu
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ‘जय गुजरात’ला उत्तर मिळणार?
दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंना जय गुजरातवरून लक्ष केल्यानंतर शिंदेंच्या सेनेकडूनही आता ठाकरे पिता-पुत्र आणि शरद पवार यांचा जुना व्हिडिओ समोर आणत टिका करणार्यांना आरसा दाखवला आहे. शिंदेच्या सेनेकडून व्हायरल करण्यात आलेल्या व्हिडिओत शरद पवार हे जय हिंद जय कर्नाटक जय महाराष्ट्र म्हणत आहेत. तर उद्धव ठाकरेंकडूनही जय गुजरातची 2019च्या लोकसभा निवडणूकीतला व्हिडिओ समोर आणला आहे. तर आदित्य ठाकरेंचा जय उत्तरप्रदेश म्हणाल्याचा व्हिडिओ समोर आणला आहे. त्यामुळे आज ठाकरे बंधुकडून शिंदेच्या वक्तव्याचा समाचार घेण्याची शक्यता असतानाच शिंदेंनीही ठाकरेसह पवारांना आरसा दाखवला आहे. त्यामुळे या टीकेला आता या विजयी मेळाव्यातून नेमकं काय उत्तर दिलं जातं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.