मी मराठी, महाराष्ट्रासाठी इतका कडवट का? राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा ‘तो’ खास किस्सा
राज ठाकरे मुंबई : मराठी प्रेम आमच्या धमन्यांमध्ये नेमकं आलो कुठून? महाराष्ट्रासाठी मराठीसाठी मी एवढा कडवट का झालो? यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचे अनेक प्रसंग आहे त्यातला एक प्रसंग मला आज आवर्जून सांगू का वाटतो. कारण आमच्यासाठी हे बाळकडू खऱ्या अर्थाने बाळकडूच होतं. असे सांगत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या सोबतचा खास प्रसंग सांगत आपल्या भाषणाचा शेवट केला.
हा प्रसंग 1999 सालचा आहे. यावर्षी शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही याबद्दल संभ्रम होता. याच वेळी शरद पवार यांनी आपला राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला होता. यावेळी सत्ता स्थापनेच्या वादामध्ये तेव्हा काहीच होत नव्हतं. दिवस उजाडत होते मात्र मार्ग निघत नव्हता. त्यातच एके दिवशी दुपारी मातोश्री पुढे दोन गाड्या लागल्या. यावेळी प्रकाश जावडेकर हे आणि काही मंडळी आमच्याकडे आली. आणि म्हणू लागली की बाळासाहेबांना भेटायचं आहे. मात्र बाळासाहेबांच्या आरामाची ती वेळ असल्यामुळे त्यांना मी भेटण्यास नकार दिला. मात्र ही भेट महत्त्वाची असल्याचे सांगत मी बाळासाहेबांना केवळ त्याचा निरोप दिला.
मराठीसाठी बाळासाहेब या माणसाने सत्तेला लाथ मारली- राज ठाकरे
यावेळी त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा प्रश्न सुटला आहे. यावेळेस त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुरेशदादा जैन हे होतील हे आम्ही दोन्ही बाजूने ठरवलं आहे. हा निर्णय मी बाळासाहेबांना सांगितला आणि त्यांना ही माहिती कळवली. यावर बाळासाहेबांनी उत्तर दिलं की त्यांना जाऊन सांग की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नाही. त्या क्षणी मला कळलं की मराठीसाठी या माणसाने सत्तेला लाथ मारली. हे संस्कार ज्या पोरावर झाले असतील तो मराठीसाठी तडजोड करेल का असा प्रश्न या निमित्ताने राज ठाकरे यांनी विचारत यावेळी भाष्य केलं.
कुठून त्रिभाषा सूत्र आणलं, त्रिभाषा सूत्र आलं ते फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील दुव्यासाठी त्रिभाषा सूत्र आणलं गेलं. कोर्टात, हाय कोर्टात, सुप्रीम कोर्टात इंग्रजीचा वापर होतो, कुठं आहे भाषा सूत्र, नव्या शिक्षण धोरणात नाही, इतर कुठल्याही राज्यात नाही, दक्षिणेतील राज्य हिंग लावून विचारत नाहीत, महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय घडतं, हे राज्यकर्त्यांना समजलं असेल , त्याशिवाय का माघार घेतली, असं ही राज ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.