रजत पाटीदार वादग्रस्तरित्या आऊट; विराट कोहली संतापला, भर मैदानात घातला राडा, अंपायरला झापलं, ने
रजत पाटीदार झेल वाद GT vs RCB IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील आयपीएल 2026 चा 42 वा सामन्यात मैदानावरचा पारा चांगलाच चढला. आरसीबीचा फलंदाज रजत पाटीदार याला ज्या पद्धतीने आऊट देण्यात आलं, त्यावरून किंग विराट कोहली आणि हेड कोच अँडी फ्लॉवर थेट पंचांशी भिडल्याचं पाहायला मिळालं.
अहमदाबादमध्ये गरम होत आहे! 🔥#जेसनहोल्डर पकडले #राजतपाटीदार सीमेवर, पण #RCB शिबिराचा निर्णय पटला नाही! 👀#TATAIPL 2026 ➡️ #GTvRCB | आता थेट 👉https://t.co/K8vuSzrZ1d pic.twitter.com/GwfAoIelDj
— स्टार स्पोर्ट्स (@StarSportsIndia) 30 एप्रिल 2026
नेमकं प्रकरण काय?
प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीची सुरुवात खराब झाली होती. 35 धावांवर दोन विकेट्स पडल्यानंतर रजत पाटीदार आणि देवदत्त पडिक्कल डाव सावरत होते. 8 व्या षटकात गुजरातच्या अरशद खानने एक शॉर्ट चेंडू टाकला. पाटीदारने त्यावर पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागून हवेत उडाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या जेसन होल्डरने धावत जाऊन चेंडू टिपला.
होल्डरने झेल घेतल्याचा दावा केला, पण रिप्लेमध्ये चेंडू जमिनीला स्पर्श करत असल्याचा संशय दिसत होता. तरीही थर्ड अंपायरने चेंडूवर पूर्ण नियंत्रण असल्याचं मानत पाटीदारला बाद ठरवलं. हा निर्णय येताच पाटीदार स्तब्ध झाला. त्याने पंचांकडे धाव घेत संताप व्यक्त केला. चेंडू ग्राऊंडला लागला आहे, हे ओरडून सांगत असतानाही पंचांनी त्याला मैदानाबाहेर जाण्यास सांगितलं.
Rajat Patidar WASN’T OUT :
– हवेत असतानाच जेसन होल्डरने झेल घेतला.
– नियंत्रण स्वच्छ दिसत नव्हते.
– त्यानंतर चेंडू जमिनीला स्पर्श झाला.
– “क्लीन कॅच” साठी, नियंत्रण स्पष्ट असणे आवश्यक आहे.
– 100% खात्री असण्याऐवजी पंचांनी निर्णयासाठी धाव घेतली. हे स्पष्टपणे अंध होते … pic.twitter.com/5a9Bg1cIBV— विपिन तिवारी (@VipinTiwari952) 30 एप्रिल 2026
विराट संतापला अन् कोचची एन्ट्री…
पाटीदार बाद झाल्यानंतर डगआऊटमध्ये बसलेला विराट कोहली स्वतःवरचं नियंत्रण गमावून बसला. आपल्या सहकाऱ्यावर अन्याय झाला आहे असं वाटताच विराटच्या चेहऱ्यावरचा संताप स्पष्ट दिसत होता. दुसरीकडे, आरसीबीचे हेड कोच अँडी फ्लॉवर यांनी थेट ‘फोर्थ अंपायर’ गाठला. पंचांसोबत त्यांचा जोरदार वाद झाला. स्क्रीनवर चेंडू जमिनीला लागल्याचं स्पष्ट दिसत असताना ‘आऊट’ कसं दिलं गेलं? हा सवाल त्यांनी आक्रमकपणे विचारला.
पाटीदार आणि कोहलीची खेळी
या संपूर्ण वादाच्या नाट्यात रजत पाटीदारला 19 धावांवर (15 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार) माघारी परतावं लागलं. विराट कोहलीनेही आक्रमक सुरुवात केली होती, त्याने 13 चेंडूत 28 धावा (5 चौकार, 1 षटकार) केल्या. मात्र, पंचांच्या या एका चुकीच्या निर्णयामुळे आरसीबीच्या गोटात तीव्र नाराजी पसरली आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.