वडिलांचा विरोध, गुडघ्याची सर्जरी अन् ऑक्शनमध्ये अपमान…; आता त्याच पाटीदारने लिहिला आयपीएलचा स

Rajat Patidar Unsold to Champion Captain : वर्ष होतं 2022. म्हणजेच साधारण साडेचार वर्षांपूर्वी. आयपीएलचा लिलाव (Auction Table) सुरू होता. खेळाडूंची खरेदी-विक्री सुरू होती. खरेदी करणाऱ्या 10 टीम्स होत्या. हजार एक खेळाडू विकले गेले, तर शेकडो अनसोल्ड राहिले. जे विकले गेले नाहीत, त्यामध्ये एक असा खेळाडू होता जो फक्त एक वर्षापूर्वीच आयपीएलच्या लिलावात उतरला होता. मध्यप्रदेशच्या इंदूरमधील या खेळाडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) त्याच्या 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर बोली लावली होती. पण, पहिल्या सीजनमध्ये तो फक्त 4 मॅचेस खेळला आणि 71 रन्स करू शकला. या कामगिरीमुळे टीमने त्याला पुढच्या ऑक्शनपूर्वी रिलीज केले. इंदूरचा हा नवीन मुलगा त्या वर्षी ‘अनसोल्ड’ राहिला, म्हणजेच त्याला कोणीच खरेदी केले नाही. आता थेट 2026 मध्ये या. ज्या खेळाडूला कोणी खरेदी केले नव्हते, त्याच अनसोल्ड खेळाडूच्या कॅप्टन्सीखाली आता आरसीबीकडे आयपीएलच्या दोन-दोन ट्रॉफीज आहेत, त्याही सलग जिंकलेल्या… हा पराक्रम करणाऱ्या खेळाडूचे नाव आहे रजत पाटीदार.

17 वर्षांपासून फक्त एका ट्रॉफीसाठी तरसणाऱ्या आपल्या टीमला त्याने एक नाही, तर सलग दोनदा जेतेपदाची चव चाखवली. यासह तो आयपीएलच्या अशा एका इलिट क्लबमध्ये सामील झाला, जिथे आतापर्यंत फक्त महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा होते. म्हणजेच, आपल्या टीमला सलग दोनदा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या कर्णधारांच्या यादीत आता रजत पाटीदारचे नाव जोडले गेले आहे.

वडिलांचा विरोध, गुडघ्याची सर्जरी अन् ऑक्शनमध्ये अपमान… (Rajat Patidar Unsold to Champion Captain)

पाटीदारचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. इंदूरचा राहणारा रजत पाटीदारमधील क्रिकेटर पहिल्यांदा त्याच्या आजोबांनी ओळखला. त्याचे वडील त्याला फॅमिली बिझनेसमध्ये आणू इच्छित होते, पण आजोबांनी रजतचा खेळ पाहून ठरवले की नातू क्रिकेटच खेळणार. त्यांना क्रिकेट अकॅडमीत पाठवण्यात आले. सुरुवातीला रजत पास्ट बॉलर बनू इच्छित होता, पण तिथे त्याची लय जमली नाही. त्याने ट्रॅक बदलला आणि ऑफ-स्पिन बॉलिंग शिकण्यास सुरुवात केली. 18 वर्षांपर्यंत त्यांना कोणतीही मोठी संधी मिळाली नाही.

करिअर सुरू होण्यापूर्वीच 2014 मध्ये फुटबॉल खेळताना त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. सर्जरी झाली आणि तो 8 महिने खेळापासून दूर राहिला. त्यानंतर घरच्यांनी पुन्हा बिझनेस सांभाळण्याचा सल्ला दिला. पण, त्याला चेतेश्वर पुजारा यांच्याकडून प्रेरणा मिळाली. पुजाराचीही गुडघ्याची सर्जरी झाली होती, तरीही त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. रजतने विचार केला, “जर पुजारा हे करू शकतात, तर मी का नाही?” त्यानंतर सर्जरीच्या 18 महिन्यांनंतर पाटीदार याने मध्यप्रदेशच्या रणजी टीममधून ओपनर म्हणून डेब्यू केला आणि पहिल्याच मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शतक ठोकले.

रजत पाटीदारने लिहिला आयपीएलचा सर्वात मोठा इतिहास (Rajat Patidar Champion Captain RCB IPL 2026)

देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यामुळे त्यांना आयपीएल ट्रायल्ससाठी बोलावण्यात आले. आधी केकेआरने ट्रायल घेतली, पण 2021 मध्ये आरसीबीने त्यांना बेस प्राईसवर खरेदी केले. त्या सीजनमध्ये विराट कोहलीच्या कॅप्टन्सीखाली ते 4 मॅचेस खेळले आणि 71 धावा केल्या. पण 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये त्याला आरसीबीने रिलीज केले आणि तो अनसोल्ड राहिले.

पण, 2022 मध्ये आरसीबीचा मिडल ऑर्डर बॅट्समन लवनीत सिसोदिय जखमी झाला आणि आरसीबीला रजत पाटीदारची आठवण आली. रिप्लेसमेंट म्हणून त्यांना टीममध्ये सामील करण्यात आले. आयपीएल 2022 मध्ये त्याने 8 सामन्यात 275 धावा केल्या. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या एलिमिनेटर मॅचमध्ये त्याने 49 चेंडूंत 112 धावा ठोकल्या.

2023 चा सीजन दुखापतीमुळे वाया गेला, पण 2024 पासून रजत पाटीदार यांचा खरा सूर्योदय झाला. 2025 मध्ये राहुल द्रविड, अनिल कुंबळे, डॅनियल व्हिटोरी, शेन वॉटसन, फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली जे करू शकले नाहीत, ते रजत पाटीदारने करून दाखवले. त्याने 2025 मध्ये आरसीबीला पहिले आयपीएल जेतेपद मिळवून दिले.

विराट कोहलीच्या मार्गदर्शनाखाली रजतची कॅप्टन्सी आणि बॅटिंग आणखी बहरली. या सीजनमध्ये त्याने 15 सामन्यात 501 धावा केल्या. क्वालिफायर-1 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध फक्त 33 चेंडूंत नाबाद 93 धावा करत त्याने आरसीबीला सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचवले आणि सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवले.

हे ही वाचा –

Vaibhav Sooryavanshi 5 Awards IPL 2026 : RCB जिंकली, पण वैभव सूर्यवंशी एकटाच आला अन् सगळी लाईमलाईट घेऊन गेला! 35 लाखांसह जिंकली कार, किती अवॉर्ड्स मिळाले?

आणखी वाचा

Comments are closed.