आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द

मुंबई : केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जागावाटपासंदर्भात चर्चा केली होती. याशिवाय, पत्रकार परिषदेतून त्यांनी महायुतीमध्ये (Mahayuti) महापालिका निवडणुकांसाठी आम्हाला जागा द्यावात, आपच्या पक्षाला सन्मानजनक वागणूक देत आमदारकी, महामंडळ आणि मंत्रीपद देण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे, आठवलेल्या रिपाइ पक्षाकडून मुंबई) काही उमेदवारांच्या नावाची यादीही जाहीर केली होती. त्यामुळे, महायुतीत आठवलेचं भाजप-शिवसेनेपुढे आव्हान उभं ठाकलं होतं, अखेर रामदास आठवले (RPI) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण महायुतीसोबत असल्याचे जाहीर केले. मात्र, मुंबईत आम्ही 20 जागांवर मैत्रिपूर्ण लढत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आ गया है 2026 का नया वर्ष, हमे हो रहा है बहुत हर्ष.. अशी चारोळी करत रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेला सुरुवात केली. मुंबईत 15 जानेवारीला निवडणुकीसाठी मतदान होत आहे. एनडीए आघाडी राज्यात स्ट्राँग आहे. अनेक ठिकाणी भाजप, शिवसेना आणि RPI एकत्र निवडणूक लढत आहे. नगरपालिका निवडणुकीत सर्वात जास्त जागा महायुतीला मिळाल्या आहेत, तर, महाविकास आघाडीत फूट पडली होती.

उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्याने काँग्रेस वेगळी निवडणूक लढवत आहे. मुंबईत कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा महापौर झाला पाहिजे हे आम्ही ठरवलं आहे. मुंबईत आम्हाला जागा न दिल्याने आम्ही 20 ठिकाणी मैत्रीपूर्ण निवडणूक लढवत आहोत. अनेक दिवस जागावाटप चालल्याने घोळ झाला, पण आम्हाला मुंबईत काही जागा मिळाल्या पाहिजे होत्या. 20 जागी आम्ही RPI चिन्हावर मैत्रीपूर्ण निवडणूक लढत देणार तर बाकी ठिकाणी आम्ही महायुतीला समर्थन देत आहोत, असे आठवले यांनी जाहीर केले.

मुंबईत स्वीकृत नगरसेवक, एक विधानपरिषद

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकास होत आहे, मोदी सरकारने मुंबईसाठी मोठा पैसा दिला, असे रामदास आठवले यांनी म्हटले. तसेच, पुण्यात 9 जागा आम्हाला मिळाल्या आहेत. पिंपरीही काही जागा मिळाल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी 7-8 जागा मिळाल्या आहेत. मुंबईत रिपब्लिकन पक्षाकडे लक्ष दिलं गेलं नाही, महायुतीत असूनही आमच्याकडे दुर्लक्ष झालं. मुख्यमंत्री फडणवीस-एकनाथ शिंदेसोबत चर्चा झाली. त्यावेळी, मुंबईत स्वीकृत नगरसेवक देऊ असं ते म्हणाले आहेत. तसेच, फडणवीसांनी एक विधानपरिषद देण्याचे मान्य केलं आहे, अशी माहितीही रामदास आठवलेंनी दिली. दरम्यान, गुंडांना उमेदवारी अजित पवारांनी दिली आहे, ते योग्य नाही अशी आमची भूमिका असल्याचेही आठवलेंनी स्पष्ट केले.

हेही वाचा

मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी

आणखी वाचा

Comments are closed.