आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा

रामदास आठवले: काही दिवसांपूर्वी बकरी ईदच्या कु्र्बानीवरुन भाजपने घेतलेल्या आक्रमक भूमिकेबाबत भाजपला घरचा आहेर देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आता महायुतीला निर्वाणीचा इशारा दिला आहे. रामदास आठवले किंवा आरपीआय (RPI) पक्षाला गृहीत धरु नका. विधान परिषदेत (Vidhan Parishad Election 2026) आम्हाला हक्काची जागा मिळायला हवी होती. तसेच आगामी महामंडळ वाटपात आरपीआय पक्षाला वाटा मिळाला पाहिजे, असे रामदास आठवले यांनी महायुतीला (Mahayuti) ठणकावून सांगितले आहे. रामदास आठवले यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन आपल्या या भावना व्यक्त केल्या आहेत. (Maharashtra Politics news)

रामदास आठवले यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये भाजपला जुन्या दिवसांची आठवण करुन दिली आहे. ज्या काळात भाजप-शिवसेनेसोबत इतर कोणतेही नेते आणि पक्ष येत नव्हते, त्या कठीण काळात आपला RPI पक्ष त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहिला. भाजप-शिवसेनेच्या युतीसोबत जेव्हा आपली RPI ची ताकद जोडली गेली, तेव्हाच खऱ्या अर्थाने या युतीची ‘महायुती’ झाली आहे. आज आपण गरीब आणि शोषित घटकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात यशस्वी झालो असून, आपला पक्ष देशभरात वेगाने वाढत आहे. भविष्यात आपल्या पक्षाला कोणीही गृहीत धरू नये आणि सत्तेत आपला हक्क व सन्मान अबाधित राहावा, यासाठी आता RPI च्या सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने व नव्या जोमाने मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

आपला RPI पक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणारा पक्ष आहे. दिलेला शब्द पाळणे हा माझा स्वभाव असल्यामुळे, माझ्याकडून महायुतीत कधीही दगाफटका होणार नाही. ‘आठवले कुठेही जाणार नाहीत आणि ते दगा करत नाहीत’ पण याचा अर्थ आम्हाला कोणीही गृहीत धरावे असा नाही. विधान परिषदेत आम्हाला हक्काची जागा मिळायला हवी होती आणि आता महामंडळांच्या नियुक्त्यांमध्ये तरी आमच्या या प्रामाणिक निष्ठेचा व मैत्रीचा योग्य तो सन्मान राखला गेलाच पाहिजे, अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा

Mahayuti Mahamandal Vatap: मोठी बातमी: राज्यातील महामंडळाचे महिन्याभरात वाटप, देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाची सूचना, महायुतीत कोणाच्या वाट्याला किती जागा?

Ramdas Athawale on Bakri Eid: बकरी ईदच्या कुर्बानीवरुन भाजप आक्रमक, रामदास आठवले म्हणाले, ‘संविधानाला छेद देणारं काही होऊ नये, सगळे आपलेच…’

आणखी वाचा

Comments are closed.