‘पक्षाने शब्द पाळला नाही!’ परिचारक समर्थकांचा भाजपवर तीव्र संताप; स्वतः प्रशांत परिचारकांकडून
सोलापूर : सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीची आशा असणारे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना पक्षाने डावलले. यानंतर परिचारकांचे समर्थक असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी (Vidhan Parishad Election 2026) सोशल मीडियातून पक्षाकडे जोरदार संताप व्यक्त करीत मालक आता निर्णय घ्या अशी मागणी केल्याचे समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून प्रशांत परिचारक हे निवडणूक लढविण्याची तयारीत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणी तात्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना परिचारकांकडे पाठवून विधान परिषदेचा शब्द देत निवडणूक लढविण्यापासून रोखले होते.(Vidhan Parishad Election 2026)
यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून समाधान आवताडे हे दुसऱ्यांदा निवडून आले. त्यावेळी पक्षाकडून देण्यात आलेला शब्द यावेळी नक्की पाळला जाईल अशी आशा परिचारक यांचे सह त्यांच्या सर्व समर्थकांना होती. मात्र ऐन वेळेला परिचारक यांना डावलून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देण्यात आली. राजेंद्र राऊत हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते त्यामुळे संधीही निवडणूक लढविलेल्या प्रशांत परिचारक यांना मिळेल अशी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे अपेक्षा होती. मात्र पक्षाने उमेदवारी देताना सोलापूर विधान परिषदेचे विद्यमान आमदार प्रशांत परिचारक यांना डावलून राऊत यांना संधी दिली.(Vidhan Parishad Election 2026)
यामुळे पंढरपूर मंगळवेढ्यातील भाजप पदाधिकारी आणि परिचारक समर्थक संतापले असून सोशल मीडियावर आता ताकद दाखवा अशी मागणी करू लागले आहेत. भाजपसाठी ही अडचणीची गोष्ट असली तरी स्वतः प्रशांत परिचारक यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. पक्षाने आपल्याला सर्व काही दिले असून अंतर्गत अडचणीमुळे उमेदवारी मिळाली नसेल मात्र कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त होऊ नये असे आवाहनही प्रशांत परिचारक यांनी केले आहे. परिचारक हे गेल्या निवडणुकीत दीपक साळुंखे यांचा पराभव करून विधान परिषदेवर निवडून गेले होते. पंढरपूर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेत परिचारकांचे वर्चस्व असून जिल्ह्यातही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र प्रशांत परिचारक यांची भूमिका पाहता त्यांनी बंडखोरी बाबत कोणतीही भूमिका घेतली नसल्याने कार्यकर्त्यांची नाराजी ही पेल्यातील वादळ ठरू शकणार आहे.(Vidhan Parishad Election 2026)
Vidhan Parishad Election 2026: भाजपच्या 11 उमेदवारांची यादी
वर्धा चंद्रपूर गडचिरोली- अरुण लखाणी
भंडारा-गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर
अमरावती- प्रवीण पोटे
सोलापूर- राजेंद्र राऊत
सांगली सातारा- धैर्यशील कदम
अहिल्यानगर- प्राजक्त तनपुरे
छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट
नांदेड – अमर राजूरकर
धाराशिव बीड लातूर- बसवराज पाटील
जळगाव- नंदकिशोर महाजन
नागपूर- राजीव पोतदार
Vidhan Parishad Election 2026: शिवसेनेच्या 4 उमेदवारांची यादी
ठाणे- रवींद्र फाटक
नाशिक- नरेंद्र दराडे
परभणी-हिंगोली- सईद खान
यवतमाळ- दुष्यंत चतुर्वेदी
Vidhan Parishad Election 2026: राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 उमेदवारांची यादी
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग- अनिकेत तटकरे
पुणे- विक्रम काकडे
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. सोलापूर, अहमदनगरठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.
Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
अर्ज माघारीची मुदत- 4 जून
मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
मतमोजणी- 22 जून
Vidhan Parishad Election 2026: आधी कोणती जागा कोणाकडे होती? आणि कोणाकडे किती जागा?
आधीचे आमदार कोण?-
सोलापूर : प्रशांत परिचारक (भाजप)
अहिल्यानगर : अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी)
ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना)
जळगाव : चंदूभाई पटेल (भाजप)
सांगली-सातारा : मोहनराव कदम (काँग्रेस)
नांदेड : अमर राजूरकर (काँग्रेस)
यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)
पुणे : अनिल भोसले (राष्ट्रवादी)
भंडारा-गोंदिया : परिणय फुके (भाजप)
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)
नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना)
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : रामदास आंबटकर (भाजप)
अमरावती : प्रवीण पोटे (भाजप)
धाराशिव-लातूर–बीड : सुरेश धस (भाजप)
परभणी-हिंगोली : विप्लव बाजोरिया (शिवसेना)
छत्रपती संभाजीनगर-जालना : अंबादास दानवे (शिवसेना)
नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)
आणखी वाचा
Comments are closed.