पुण्यात 7 उमेदवार, 11 अर्ज; बाहेरून आलेल्या विक्रम काकडेंना संधी का? अजित पवार गटात बंडाची ठिणग
पुणे : विधान परिषदेच्या सतरा जणांसाठी अर्ज दाखल कालचा अखेरचा दिवस होता. आजपासून अर्जाची छाननी होणार होणार आहे. काही ठिकाणी मित्र पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. महायुतीमध्ये बंडखोरीचे (Vidhan Parishad Election 2026) प्रमाण जास्त असल्याने या बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावण्यासाठी आणि त्यांची मन धरणीसाठी प्रयत्न करावी लागणार आहे. पुण्यात तर राष्ट्रवादीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा झाला आहे, पार्थ पवारांचे मित्र विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळे सुनील टिंगरे नाराज असल्याचे समोर आले. शेवटी विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनीही अर्ज दाखल केलाय.(Vidhan Parishad Election 2026)
पुण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2026) संजय काकडे यांचा मुलगा विक्रम काकडे यांना महायुतीची उमेदवारी मिळाली, मात्र पुण्यात राष्ट्रवादीच्या (Vidhan Parishad Election 2026) सुनील टिंगरे यांनीही अर्ज दाखल केला आहे आणि हा डमी अर्ज असल्याचं सांगितले जातेय, दुसरीकडे भाजपच्या प्रदीप कंद यांनी ही बंडखोरी करत पक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे महायुतीत बंडखोरी रोखण्यासाठी कंद यांना अर्ज मागे घ्यायला लावण्याचा आव्हान राष्ट्रवादी समोर आहे. दुसरीकडे विक्रम काकडे यांच्या उमेदवारीमुळे खुद्द राष्ट्रवादीतच पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे. विक्रम काकडे हे संजय काकडे यांचा मुलगा आहे आणि माजी आमदार अनिल भोसले यांचे जावई आहेत. (Vidhan Parishad Election 2026)
Vidhan Parishad Election 2026: पुण्यात ७ उमेदवारांचे अर्ज, दोन्ही राष्ट्रवादीसह, भाजप, अपक्षांनी भरले अर्ज
विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांनी ११ अर्ज दाखल केले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या प्रत्येकी दोन उमेदवारांचा समावेश आहे. भाजपच्या प्रदीप कंद यांनी पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन अर्ज भरले आहेत. तर दोन अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्जाची छाननी आज (मंगळवारी) होणार असून अर्ज माघारीसाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.(Vidhan Parishad Election 2026)
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सात जणांनी ११ अर्ज भरले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विक्रम काकडे यांनी अधिकृत अर्ज भरला आहे. तर याच पक्षाचे सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. टिंगरे यांचा अर्ज डमी असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे श्रीकांत पाटील तसेच तुषार कामठे यांनी अर्ज भरला आहे. यातील कामठे यांचा अर्ज डमी असल्याची माहिती आहे. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी भाजपतर्फे तसेच अपक्ष असे दोन अर्ज भरले आहेत. याशिवाय उमेश म्हेत्रे आणि रणजीत तरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, अर्जाची छाननी मंगळवारी (दि. २) होणार असून अर्ज माघारी बुधवारपर्यंत (दि. ४) घेता येणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.(Vidhan Parishad Election 2026)
Vidhan Parishad Election 2026: पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत
विधान परिषदेच्या निवडणुकीत पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लहत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीत पुण्याची जागा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडे असून, प्रभारी शहराध्यक्ष श्रीकांत पाटील हे रिंगणात आहेत. तर महायुतीत ही जागा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे असून, पक्षाने विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादीमध्येच खरा सामना रंगणार आहे.
दरम्यान, काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षापुढे भाजपची बंडखोरी रोखण्याचे आव्हान आहे. जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून विक्रम काकडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनीही डमी अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडे आल्याने पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा डमी अर्ज तुषार कामटे यांनी दाखल केला आहे
Vidhan Parishad Election 2026: काकडेंना संधी दिल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजी
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पक्षात काही तासांपूर्वी प्रवेश करणारे काकडे यांना उमेदवारी दिल्यामुळे निष्ठावंत नाराज झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांची उमेदवारी डावलल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या व्यक्तीला थेट उमेदवारी का, असा संतप्त सवाल कार्यकत्यांनी यावेळी उपस्थित केला.
विधान परिषद निवडणूक 2026: सांगली–सातारा मतदारसंघातही बंडखोरी
भाजपकडून धैर्यशील कदम यांना रात्री उशिरा अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, इथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तानाजी पाटील यांनी बंडखोरी केली आहे. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आमदार जयंत पाटील यांचे चुलत बंधू प्रशांत उर्फ बाळासाहेब पाटील आणि अभय जगताप यांनी, तर काँग्रेसकडून ऐनवेळी संजय मेंढे आणि मयूर पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत.
Vidhan Parishad Election 2026: विदर्भ विभाग (अमरावती, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ)
अमरावतीची जागा महायुतीत भाजपच्या प्रवीण पोटे पाटील यांना मिळाली आहे. मात्र, शिवसेना (शिंदे गट) चे माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी अपक्ष अर्ज भरून बंडखोरी केली आहे. त्यांना आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची छुपी मदत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भंडारा-गोंदियामध्ये काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे सुपुत्र प्रफुल अग्रवाल यांनी काँग्रेसचे तिकीट नाकारत अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसने ऐनवेळी माजी आमदार दिलीप बणसोड यांना एबी फॉर्म दिला. महायुतीमधूनही राष्ट्रवादीचे नरेश ईश्वरकर, अभिषेक कारेमोरे आणि भाजपचे सचिन कुंभलकर यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत.चंद्रपूर–गडचिरोली–वर्धामध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार अरुण लाखाणी यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नेते सुधीर कोठारी यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. यवतमाळमध्ये शिवसेनेकडून (शिंदे गट) दुष्यंत चतुर्वेदी मैदानात आहेत, मात्र भाजपच्या नितीन भुतडा यांनीही इथे बंडखोरी करत अर्ज दाखल केला आहे.
Vidhan Parishad Election 2026: मराठवाडा विभाग (छत्रपती संभाजीनगर, परभणी-हिंगोली)
छत्रपती संभाजीनगरमध्ये ही जागा महायुतीत भाजपकडे गेली असून सुहास शिरसाट यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, शिवसेनेचे नेते मंत्री अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज भरून मोठी बंडखोरी केली आहे. या बंडखोरीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तारांना तातडीने मुंबईला बैठकीसाठी बोलावले आहे. तर परभणी-हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे डॉक्टर विवेक नावंदर उमेदवार आहेत, पण काँग्रेसच्या सुरेश देशमुखांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी बंडखोरी केली आहे. महायुतीकडून शिवसेनेचे (शिंदे गट) सय्यद खान उमेदवार असताना अजित पवार गटाच्या विजय जामकर आणि संग्राम जामकर यांनी अर्ज भरले आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.