बाळासाहेबांच्या बॉडीचा दोन दिवस छळ केला, उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं


Ramdas Kadam On Balasaheb Thackeray मुंबई: बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Death) यांचे निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते. हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते? असा शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आरोप केला आहे. शिवसेना शिंदे गटाचा काल दसरा मेळावा झाला. त्यावेळी रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या मृतदेहाबाबत खळबळजनक दावा केला. या दाव्यानंतर आज रामदास कदम यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पुन्हा आव्हान दिलं आहे.

उद्धव ठाकरे कपटी आहेत. मी जे बोललो त्यावर उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण करावे. अंबादास दानवे काय मला शिकवणार शिवसेना, मी त्यांना निवडून आणलं. बाळासाहेबांच्या बॉडीचा दोन दिवस छळ केला. मी खोटो बोलतोय तर माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट होऊन जाऊ देत, असं आव्हान देखील रामदास कदम यांनी दिलं. बाळासाहेब ठाकरेंच्या हातांच्या ठसाचा उपयोग कशासाठी झाला, याबाबत उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं, असंही रामदास कदम म्हणाले.

बाळासाहेब गेल्याचं मला डीक्लेअर करायला सांगितलं- रामदास कदम (Ramdas Kadam On Uddhav Thackeray)

बाळासाहेब ठाकरे आजारी होते. तेव्हा कोणालाही जवळ जाऊन देत नव्हते. बाळासाहेब गेल्याचं मला डीक्लेअर करायला सांगितलं. मी त्यांना (उद्धव ठाकरेंना) बोललो बाळासाहेब यांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा हे दैवत आहे.  तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले मी हाताचे ठसे घेऊन ठेवलेत. हे माझं (रामदास कदम) आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं सांभाषण होतं. मी काल ठरवून नाही बोललो, ओघाओघाने बोललो, असं रामदास कदम यांनी सांगितले. 50 वर्षे मातोश्री जाणणारा माणूस असा का बोलतो याचा विचार करतो, असंही रामदास कदम म्हणाले.

शरद पवारांनाही जाऊ दिलं नाही- रामदास कदम (Ramdas Kadam On Balasaheb Death)

मी ज्यावेळी बोलले तेव्हा मातोश्रीला हादरा बसेल. मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत निष्टेने दिवस काढले. मीडियाने जावं डॉक्टरांना विचारावं. मी जे बोललो त्यावर मी ठाम आहे. 2 दिवस कोणालावरती पाठवला नाही.  शरद पवार यांनासुद्धा वरती जाऊ दिलं नाही.  शरद पवार म्हणाले, मिलिंद उद्धव बाळासाहेबांच्या बॉडीला का त्रास देतोय?, असा दावाही रामदास कदम यांनी केला. उद्धव ठाकरेबद्दल बाळासाहेब काय म्हणाले हे मला माहितीये. जे बोललो ते वास्तव आहे. तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा की तुम्ही बाळासाहेबांचे ठसे घेतले की नाही? उद्धव ठाकरे नेमका काय आहे, हे महाराष्ट्रला कळेल, रामदास कदम यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं खुलं आव्हान, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=NM2BHRH4FE8

आणखी वाचा

Comments are closed.