एकनाथ शिंदे यांच्याचं मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट आहे का? रामदास कदमांचा सवाल

रामदास कडम: विधीमंडळाच्या अधिवेशनात आरोप करण्याच्या आधी 35 ची नोटीस द्यावी लागते, मात्र असे झालेले नसतानाही मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्याबाबत आरोप कसे स्वीकारण्यात आले? असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. याबाबत खोलात जाणे महत्त्वाचं असल्याचे रामदास कदम म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यांचं मंत्र्यांना बदनाम करण्याचा हा कट आहे का? हे बघावे लागेल असंही रामदास कदम म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपरिषद खेड अंतर्गत स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र नुतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी कदम बोलत होते.

शिवसेनेचा बालेकिल्ला आहे म्हणून मुंबई गोवा महामार्गाचे काम होत नाही का?

मुंबई गोवा महामार्गाचे काम होत नाही. कारण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे म्हणून? असा सवाल रामदास कदम यांनी केला. कोकणात मुंबई-गोवा महामार्ग तुम्ही पहिला हे, इथून मुंबईत गेलात की महामार्गाच्या कामाचे बघा अस रामदास कदम म्हणाले. रामाचा वनवास बारा वर्षात संपला पण मुंबई गोवा महामार्गाचा संपेना असेही रामदास कदम म्हणाले. जोपर्यंत महामार्गाचा प्रश्न संपत नाही तोपर्यंत गोगावले यांना पालकमंत्री पद नाही असा टोला देखील रामदास कदम यांनी लगावला. सध्या मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळं लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

योगेश कदम काम करणारा कार्यकर्ता : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

योगेश कदम काम करणारा कार्यकर्ता असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. दरोडेखोर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं. कारण नसताना श्रीकांत शिंदेंना टार्गेट करत आरोप केले जात आहेत. पण यांच्या आरोपाकडे लक्ष द्यायचं नाही हे मी सांगितल्याचे कदम म्हणाले. जे काँग्रेसच्या इशारावर नाचतात त्यांनी डान्स बार वर बोलावं? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. योगेश कदम यांच्यामागे पूर्ण शिवसेना आहे. सत्तेचा टांगा पलटी करणारा हा एकनाथ शिंदे आहे. हम किसिको छेडते नहीं, हमे जो छेडता है उसे छोडते नही असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या:

हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव; डान्सबारवरुन जुंपली, रामदास कदमांचे अनिल परबांवर पलटवार

आणखी वाचा

Comments are closed.