मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात
रमेश परदेशी: मुळशी पॅटर्न या चित्रपटातील ‘ पिट्या भाई ‘ या भूमिकेने अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिलेले अभिनेते रमेश परदेशी उर्फ पिट्या भाऊ भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे .काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना संघाच्या गणवेशावरून रमेश परदेशी यांना छापल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या .त्यानंतर आज थेट रमेश परदेशी यांनी एक सूचक फेसबुक पोस्ट केली आहे संघाच्या गणवेशातील फोटो पोस्ट करत लिहिलेली ही पोस्ट सध्या लक्ष वेधून घेत आहे . मी माझ्या विचारांसोबत राष्ट्रप्रथम .. असं लिहीत त्यांनीही पोस्ट केली आहे . त्यामुळे ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे .
काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुळशी पॅटर्न सेम अभिनेते रमेश परदेशी यांना सुनावल्याची चर्चा होती .त्यांनी आरएसएसच्या संचलनाचा फोटो सोशल मीडियावर टाकल्याने हा वाद ओढवल्याचं कळत होतं . त्यानंतर राज ठाकरेंनी छाती ठोकपणे सांगतो मी संघाचा कार्यकर्ता आहे असं म्हणताय तर मग इथे कशाला टाईमपास करायला आलात ? एकाच ठिकाणी कुठेतरी राहा असं ते म्हणाले होते . यावर अभिनेते रमेश परदेशी यांनी असं काहीही घडलं नसल्याचं सांगितलं होतं . दरम्यान पुन्हा एकदा अभिनेते रमेश परदेशी फेसबुक पोस्ट समोर आल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करणार का ?असा सवाल उपस्थित होत आहे .
काय केलीये फेसबुक पोस्ट ?
अभिनेते रमेश परदेशी यांनी संघ संचालनाचा एक फोटो पोस्ट करत त्यावर मी माझ्या विचारांसोबत राष्ट्रप्रथम असं लिहिला आहे . जय हिंद जय महाराष्ट्र असं म्हणत त्यांनी ही पोस्ट केली आहे . यावर अनेकांनी पिट्या भाऊ पक्ष सोडलाय का ? निर्णय घ्या एकदाचा अशा कमेंट करत आहेत .
कोण आहेत रमेश परदेशी?
अभिनेते रमेश परदेशी यांनी चित्रपटांमधून अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी पडद्यावर साकारलेला खलनायक अधिक गाजला. मात्र, त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने. या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘पिट्या भाई’ ही भूमिका विशेष गाजली होती. या चित्रपटाने त्यांच्या आयुष्याला आणि करिअरला एक वेगळी दिशा मिळवून दिली. या आधी रमेश परदेशी ‘रेगे’, ‘देऊळबंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘बेरीज वजाबाकी’ आणि अजय देवगण याच्या ‘सिंघम’ या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.