Ratnagiri News – अल्पवयीन मुलाशी गैरप्रकार करणाऱ्या प्रौढावर गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथे 12 वर्षीय मुलाशी गैरप्रकार करणाऱ्या प्रौढावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल़ा आहे. जलाल सोलकर (52,रा.मिरकरवाडा रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
जलाल याने पिडीत मुलाशी ओळख वाढवून त्याच्याशी गैरप्रकार केल्याचा प्रकार केला.ही बाब पिडीत मुलाच्या पालकांना समजताच त्यांनी याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पिडित मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार जलाल याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलाल याला शहर पोलिसांनी अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Comments are closed.