एकच जिद्द, अणुऊर्जा प्रकल्प रद्द! दापोलीतील अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात वणौशी तर्फे पंचनदी गावाच्या ग्रामसभेत ठराव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दापोली तालुक्यातील भिवबंदर येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध होत आहे. वणौशी तर्फे पंचनदी या गावात आज ग्रामसभेत प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात ठराव करण्यात आला. ‘एकच जिद्द, अणुऊर्जा प्रकल्प रद्द!’ अशी घोषणा ग्रामस्थांनी दिली. दापोलीत २८०० मेगावॅटचा अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे.

वणौशी तर्फे पंचनदी या गावात शेती आणि फळबागायती मोठ्या प्रमाणावर आहेत. अणुऊर्जा प्रकल्प आल्यास हा पारंपरिक रोजगार संपुष्टात येणार आहे, त्यामुळे ग्रामस्थ अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात एकवटले आहेत. आज वणौशी तर्फे पंचनदी या गावात ग्रामसभा पार पडली. या सभेला २५० ग्रामस्थ उपस्थित होते. अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांनी एकमुखी ठराव मंजूर केला. पर्यावरण, शेती, पाणी आणि जमिनीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करणारे विनाशकारी प्रकल्प कोकणात नकोत, अशी ठोस भूमिका ग्रामस्थांनी मांडली.

दापोली तालुक्यात पर्यटन वाढत आहे. पर्यटनातून रोजगारनिर्मिती होत असताना विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्प आल्यास दापोली तालुक्यातील पर्यटन व्यवसायही उद्ध्वस्त होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Comments are closed.