रत्नागिरी बातम्या – रत्नागिरी जिल्ह्यात दीड लाख 'लाडक्या वाहिनी' अपात्र
निवडणूक संपताच लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र करत धक्का दिला आहे. महिला व बाल कल्याण विभागाने केलेल्या छाननी नंतर रत्नागिरी जिल्ह्यातील १ लाख ५ हजार ५२१ लाडक्या बहिणी योजनेत अपात्र ठरल्या आहेत.
लाडकी बहिण योजनेत रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ३ लाख ७७ हजार ४७७ अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले. यापैकी २ लाख ७१ हजार ९५६ पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर योजनेचा लाभ जमा होत होता.
प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सुमारे ४० कोटी ६६ लाख रुपयांपेक्षा जास्त निधी थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, विविध कारणांमुळे तब्बल १ लाख ५ हजार ५२१ अर्ज अपात्र ठरल्यामुळे शासनाचा महिन्याला मिळणारा सुमारे १५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी वाचला आहे.महिला व बाल कल्याण विभागाच्या छाननी दरम्यान प्रमुख तांत्रिक चुका आणि नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण सांगून अर्ज अपात्र करण्यात आले आहेत.त्यामध्ये बँकेशी जोडलेल्या वैयक्तिक ओळखपत्राच्या (आधार कार्ड) क्रमांकामध्ये चुका असणे किंवा वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणे. आधीपासूनच ‘संजय गांधी निराधार योजना किंवा इतर तत्सम शासकीय मानधन योजनांचा लाभ घेत असणे. कुटुंबात शासकीय कर्मचारी असणे, कुटुंबाच्या नावावर आरटीओ नोंदणीकृत चारचाकी वाहन असणे किंवा कुटुंबातील सदस्य करदाता असणे. वय २१ वर्षांपेक्षा कमी किंवा ६५ वर्षांपेक्षा जास्त असणे. अर्जामध्ये पुरुष किंवा तृतीयपंथी घटकांची चुकीने नोंद झालेली असणे अशी कारणे देण्यात आली आहेत.
Comments are closed.