Ratnagiri News – आंतरराष्ट्रीय योगदिनी विद्यार्थ्यांचा कातळशिल्प संवर्धन, संरक्षणाचा संदेश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभरूण क्रमांक -१ मधील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील ऐतिहासिक कातळशिल्पांचे संवर्धन व संरक्षण करण्याचा संदेश देत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. कातळशिल्पाजवळ विद्यार्थ्यांनी योगासने करत कातळशिल्प संवर्धनाची जनजागृती केली आहे.

कोकणात हजारो वर्षांपूर्वी कातळावर रेखाटलेली चित्र ऐतिहासिक ठेवा आहे. कोकणातील काही गावात अशी कातळशिल्प आढळतात. ही कातळशिल्प पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक कोकणात येतात. या कातळशिल्पांचे संवर्धन आणि संरक्षण करणे गरजेचे आहे हा संदेश या बालदोस्तांनी योग दिनी दिला आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय कदम, शिक्षक संतोष रावणंग, यास्मिन कोतवाल तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments are closed.