Ratnagiri News – रत्नागिरीच्या ‘रेड्स’ अॅपने उलगडले परभणीतील खून प्रकरण; कवटीच्या रचनेवरून चेहऱ्याची प्रतिमा पुनर्रचित
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या एआय वर आधारित रेड्स’अॅपच्या मदतीने रत्नागिरी पोलीस दलाने परभणी जिल्ह्यातील एका गंभीर खून प्रकरणाचा तपास योग्य दिशेने नेण्यात यश मिळविले आहे. कवटीच्या रचनेवरून चेहऱ्याची प्रतिमा पुनर्रचित करत अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यात यश मिळाले आहे पोलिसांनी याप्रकरणात दोघांना घेण्यात आले आहे.
तपासादरम्यान रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलाच्या ‘रेडस्’ अॅपचा वापर करण्यात आला. या अॅपद्वारे अनोळखी मृतदेहाच्या कवटीच्या रचनेच्या आधारे एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून चेहऱ्याची प्रतिमा तयार करण्यात आली. हे पुनर्रचित छायाचित्र विविध ठिकाणी प्रसारित करून पोलीस पाटलांमार्फत माहिती संकलित करण्याबाबत परभणी जिल्हा पोलीस दलास मार्गदर्शन करण्यात आले. या तांत्रिक प्रक्रियेमुळे अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले. मयताचे नाव गिताराम प्रकाश मुजमुले (रा. देवनांद्रा, ता. पाथरी, जि. परभणी) असे निष्पन्न झा
Comments are closed.