भाजपचे सगळे फंडे आता उघड झाल्याने डिलिमिटेशनच्या माध्यमातून शेवटचा डाव खेळण्याचा त्यांचा प्रयत्न, रोहित पवार यांचा आरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

निवडणूक प्रक्रिया आणि मतदार याद्यांच्या संदर्भात विविध पुरावे किंवा ऑडिओ क्लिप्स समोर आणत सत्ताधाऱ्यांवर ‘मतचोरी’ करून सत्तेत आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. रोहित पवार यांनी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल करत भाजपने मतांवर टाकलेल्या दरोड्याचा हा आणखी एक पुरावा, असे म्हटले आहे. अशा प्रकारे चोऱ्या चपाट्या करूनच सत्तेत आलेला भाजप संविधान आणि लोकशाहीसाठी धोकादायक आहे. या आमच्या विरोधी पक्षांच्या मताला यामुळं एकप्रकारे पुष्टीच मिळते, असा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडिया एक्सवर एक कथित ऑडिओ क्लिप शेअर करत पोस्ट शेअर केली आहे. त्यात रोहित पवार म्हणाले की, भाजपचे सगळे फंडे आता उघड झाल्याने डिलिमिटेशनच्या माध्यमातून शेवटचा डाव खेळण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. डिलिमिटेशनला आमचा विरोध नाही; मात्र ते केवळ भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांच्या सोयीने आणि संविधानाच्या विरोधात राबवलं जाणार असेल तर ते अधिक घातक ठरेल, असा इशारा रोहित पवार यांनी दिला. मुळात मतचोरी करूनच सत्तेत आलेल्या भाजपवर विश्वास ठेवायचा कसा? असा सवाल उपस्थित करत विरोधी पक्षातील सर्वांनीच भाजपचा हा डाव ओळखून तो वेळीच हाणून पाडायला पाहिजे, असे आवाहन रोहित पवार यांनी केले.

Comments are closed.