महासत्ता होण्याची क्षमता असतानाही, गेल्या 12 वर्षांत मोदी आणि त्यांच्या कंपूंनी हिंदुस्थानला रसातळाला नेले; संजय राऊत यांची टीका
एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशन फोरम अर्थात अपेकच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशिया, चीन आणि अमेरिका या तीन देशात महत्त्वाची चर्चा झाली. या चर्चेदरम्यानचा त्यांच्या प्रमुख नेत्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ट्रम्प, जिनपिंग, पुतिन या तीन महासत्ता आहेत. मोदी-शहांच्या काळात हिंदुस्थान चौथी महासत्ता होणे शक्य नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, अमेरिका, चीन आणि रशिया या जगातील तीन अधिकृत महासत्ता असून, डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन हे त्यांचे नेतृत्व करत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उगाचच डमरू वाजवत फिरतायत. हिंदुस्थान महासत्ता असल्याचा दावा करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
हिंदुस्थान जर खरोखरच महासत्ता असता, तर या तीन देशांसोबत चौथा देश हिंदुस्थान आणि हिंदुस्थानचे पंतप्रधान असते. मात्र, दुर्दैवाने जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि अमित शहा या देशावर राज्य करत आहेत, तोपर्यंत हिंदुस्थान हा चौथा महासत्ता असलेला देश होऊ शकत नाही, असे म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधला.
हिंदुस्थानात महासत्ता होण्याची पूर्ण क्षमता असतानाही, गेल्या 12 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कंपूंनी हा देश सर्व दृष्टीने रसातळाला नेला असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.
आम्ही जगाच्या शांततेचे कैवारी! ट्रम्प, जिनपिंग, पुतिन यांची ऐतिहासिक बैठक
Comments are closed.