IND Vs NZ 1st Test – त्याचे नाव ‘सिराज’ म्हणून त्याला संघात स्थान नाही; काँग्रेसची जळजळीत टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना सुरू आहे. मात्र, हा सामना मैदानातील द्वंद्वापेक्षा मैदानाबाहेरील घडामोडींमुळे जोरादर चर्चेत आहे. चर्चेच कारण आहे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज. पहिल्या कसोटीसाठी मोहम्मद सिराजला संघातून वगळल्याने दिग्गज माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. आता काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी सुद्धा सिराजच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भेदभावाचा आरोप केला आहे.

मोहम्मद सिराजबाबत काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी ANI शी बोलताना भेदभावाचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, “असे म्हटले जात आहे की त्याची कामगिरी चांगली असूनही त्याला संघात स्थान दिले गेले नाही. त्याचे नाव ‘सिराज’ आहे, म्हणूनच त्याला स्थान दिले गेले नाही. त्याची चांगली कामगिरी असतानाही जर तुम्ही त्याची निवड करत नसाल, तर भेदभाव स्पष्ट आहे.” असं इम्रान मसूद म्हणाले आहेत. दुसरीकडे, माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि रवी शास्त्री यांनीही सिराजच्या अनुपस्थितीवर आश्चर्य व्यक्त केले असून संघ व्यवस्थापनाने त्याच्या अनुभवाचा विचार करायला हवा होता, असे मत मांडले आहे.

मात्र, कर्णधार शुभमन गिल आणि फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी या कसोटीसाठी सर्वोत्तम संभाव्य अंतिम अकरा खेळाडू निवडण्यात आल्याचे ठामपणे सांगितले आहे. दरम्यान, सामन्याचा विचार करता न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 368 धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात टीम इंडियाने एक विकेट गमावत 159 धावा करत सामन्यावर पकड निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. यशस्वी जयसवालने 89 चेंडूंमध्ये 16 चौकारांच्या मदतीने 85 धावा करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. केएल राहुलने 116 चेंडूंचा सामना करत नाबाद 52 धावा केल्या असून देवदत्त पड्डीकल 16 धावांवर फलंदाजी करत आहे.

Comments are closed.